महाराष्ट्र वेदभुमी

मुंबई गोवा महामार्ग मंत्र्यांच्या पाहणीनंतर कामाला गती, मात्र गटारावरील स्लॅब कोसळले तर काही ठिकाणी तडे.

कोलाड (श्याम लोखंडे )महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी मुंबई गोवा महामार्गाची मागील पंधरा दिवसांपूर्वीच प्रत्यक्ष पाहणी करून कामाचा आढावा घेतला. महामार्गावरील प्रत्यक्ष सुरु असलेली कामे, त्यामध्ये होत असलेली दिरंगाई, कामांचा दर्जा,जमीन हस्तांतरणात येत असलेल्या अडचणी तसेच अन्य सर्व समस्यांचे निराकरण संबंधित अधिकारी, ठेकेदार, त्याच बरोबर लगत वसलेकेल्या गाव ग्रामस्थांच्या अडचणी दूर करण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्यात येतील. तरी सर्व संबंधित यंत्रणानी महामार्गचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे अशा सूचना मंत्री भोसले यांनी दिल्या.त्यावर सुकेळी ते इंदापूर दरम्यानच्या रखडलेल्या कामाची जलद गती सुरू झाली जोरदार सुरू असलेल्या कामांवर नियंत्रण कोणाचे हाच प्रश्न आता सर्व सामान्य जनतेला पडला असून मार्गालगतचे सर्व्हिस रोड व त्याला जोडली गेलेली गटारे या कामांबाबत कोणाचे नियंत्रण आहे की नाही होत असलेल्या कामाचे तीन तेरा वाजत असून गटार लाईनवर टाकण्यात येत असलेले स्लॅब कोसळत असून काही ठिकाणी चक्क तडे जाण्यास सुरुवात झाली असून अक्षरशः या कामाचा दर्जा काय हे किती काळ टिकेल असे तर्क वितर्क केले जात आहेत...

मागील पंधरा दिवसांपूर्वी सार्व.बांधकाम मंत्री महोदय ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मुंबई गोवा महामार्गावरील पळस्पे ते रत्नागिरी दरम्यानच्या रखडलेल्या कामाची पाहणी केली यावेळी नागोठणे ते इंदापूर दरम्यानच्या कोलाड आंबेवाडी नाका, भिरा फाटा,तिसे तळवली येथील देखील उत्तम प्रकारे येथील नागरिकांशी संवाद साधत पाहणी करत संबंधित अधिकारी आणि ठेकेदार यांना ही कामे उत्तम दर्जाची आणि जलद गतीने करा अशा सूचना दिल्या.तद्नंतर तिसे तळवली येथील ग्रामस्थांची समस्या सोडविण्यात आली येथील देखील कामाला सुरुवात करण्यात आली असून या ठिकाणी सुरू असलेल्या कामाबाबत येथील नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे तर केलेल्या कामात आर सी सी गटारावर टाकण्यात येत स्लॅबला तडे जात आहेत तर चक्क एका ठिकाणी आठ दहावदिवसांपूर्वी केलेल्या कामातील स्लॅबच कोसळले त्यामुळे हे काम कसे केले जात आहे यावर कोणाचे नियंत्रण किती काळ हे काम टिकणार आहे त्यावर साऱ्यांची कुजबुज सुरू झाली असल्याचे समजते मात्र मंत्री मोहदयांच्या पाहणी दौऱ्यात ज्या सूचना कामाच्या बाबतीत दिल्या गेल्या त्यावरच आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे...

मंत्री महोदय यांच्या रखडलेले कामाच्या पाहणी नंतर पुन्हा ठेकेदाराची कामात हय गय दिसून येत आहे तिसे तळवली येथे गटार लाईनच्या कामात ठेकेदार यांच्याकडून अतिशय निष्क्रीय काम केले जात आहे असल्याचे दिसून येत आहे मात्र यावर ग्रामस्थांचा देखील चिंतेचा विषय बनला कारण अशा दर्जाच्या कामाचा फटका येथील ग्रामस्थ नागरिकांच्या जिवितास धोकादायक ठरू शकेल असे सर्वत्र बोलले जात आहे...

Post a Comment

Previous Post Next Post