महाराष्ट्र वेदभुमी

आर्थिक फसवणूक झाल्यास माणगाव पो. ठाण्यात संपर्क साधा माणगाव पोलीसांचे दुसर्यांदा आवाहन...

 


माणगांव :- (प्रतिनिधी) : माणगाव पोलीस ठाणे तर्फे दुसऱ्यांदा आवाहन करीत आहे की ज्यांचे आर्थिक फसवणूक नमूद केलेल्या "आपला एडव्हायझरी" तसेच "ट्रस्ट इंटरप्रायझेस" मध्ये झाले आहे अश्यानी माणगाव पोलीस ठाण्यात येऊन तक्रार नोंदवावेत म्हणून खास आवाहन केले आहे. दरम्यान या पूर्वीही माणगाव पोलीस यांची आवाहान पर आर्थिक फसवणूक झालेल्या लोकांनी पोलीस स्टेशन मध्ये येऊन तक्रार नोंदवले होते तर याची दखल घेऊन गुन्हा नोंद केली होते. तर गुन्हा नोंद क्रमांक ११५/२०२४, भा.दं.वि.सं. कलम ४२०, ३४ सह महाराष्ट्र ठेवीदारांच्या (आस्थापनांमधील) हित संवधांचे रक्षण करण्याबाबत चे अधिनियम ३, ४ अन्वये द. २४/०४/२०२४ रोजी गुन्हा दाखल झालेला आहे. सदर गुन्हयामध्ये आरोपी इसम क्र. १) संदेश सुरेश कवडे, रा. वंदना अपार्टमेंट, कचेरी रोड, माणगाव, ता. माणगाव, जि. रायगड; क्र. २) मनोज सदानंद तेटगुरे, रा. साळवे, ता. माणगाव, जि. रायगड यांनी श्रीकृपा अपार्टमेंट, विकास कॉलनी, माणगाव ता. माणगाव, जि. रायगड क्र. ३) देवेंद्र पांडुरंग गायकवाड, रा. निजामपुर, ता. माणगाव, जि. रायगड व क्र. ४) संजय बाळकृष्ण गायकवाड, रा. लक्ष्मी अपार्टमेंट कचेरी रोड माणगाव, ता. माणगाव, जि. रायगड यांचा सहभाग निष्पन्न झालेला आहे. आत्ता पर्यंतच्या झालेल्या तपासा मध्ये गुन्ह्यातील वर नमूद आरोपींनी चौघा जणांच्या भागीदारीत "आपला अॅडव्हायझरी" व “ट्रस्ट इंटरप्रायझेस" नावांनी कंपनी स्थापनकरुन, बिझनेस ऑफीस सुरु केले असल्याचे लोकांना सांगून, त्याबिझनेस मध्ये लोकांना पैसे गुंतवणूक करण्यास सांगून, लोकांनी केलेल्या गुंतवणूकीची रक्कम व्यवसायात टाकून, त्या व्यवसायातील मिळणाऱ्या नफ्यातून गुंतवणूकदारांना नफ्याची ६ टक्के ते ७ टक्के रक्कम प्रत्येक महिन्याला देऊ असे सांगितले व लोंकांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर आरोपींच्या कडे त्यांच्या सांगण्यावरुन गुंतवणूक करणाऱ्या लोकांना परत देण्यास टाळाटाळ करुन, आरोपींनी अनेक गुंतवणूकदारांची फसवणूक केलेली असल्याचे निषन्न होत आहे. तरी वर नमूद आरोपींकडून अशा प्रकारे फसवणूक झालेल्या लोकांनी तसेच आणखीन किती खोल वर फसवणूक झाले आहे याची तपास करण्यासाठी माणगांव पोलीस ठाणे यांनी दुसऱ्यांदा कळविले की येथे येऊन त्याबाबत तक्रार दाखल करावी असे आवाहन माणगांव पोलीस ठाणे यांचेकडून पुन्हा करण्यात येत आहे...

Post a Comment

Previous Post Next Post