माणगाव :- (नरेश पाटील) वस्ती आणि वर्दळ ठिकाणी असलेल्या एक तलाव सुदृश्य जागेत मगरिंचा वास्तव्य ठिकाणी "ड्रोन कॅमेरा" द्वारे शोध मोहीम सोमवारी रात्री दि. 10 मार्च रोजी रात्री 11 च्या सुमारास रेशक्यू टीमकडून आखण्यात आली होता. या बाबत अधीक माहिती अशी आहे की गेली दीड दोन वर्ष मगरिंचा वास्तव्य अशल्याची बाब समोर आली आहे. गेल्या वर्षी खांदाड येथील भागात अनेक मगरिंचा पिल्लू सदर तलावात पाहायला मिळाले...आत्ता तलावाचे पाणी आठत असल्याने येतील असलेल्या मगर आत्ता काठावर सतत येत असल्याने त्यांचे दर्शन होत अशल्याने भीतीचा वातावरण निर्माण झाले आहे. तलाव मोठी अशल्याने आणि वर्दळ ठिकाणी अशल्याने रेशक्यू टीमचे मदत घेण्याचे ठरले आणि काही तासात कोलाड येथीलचे रेशक्यू टीम हजर होऊन पहाणी केले असता त्यांनाही ती कठीण वाटल्याने आखेर "ड्रोन कॅमेरा" चे मदत घेण्याचे निर्णय होऊन आखेर सोमवारी दि. 10 मार्च रात्री 11:30 वाजता रेशक्यू टीम येऊन सुमारे एक तास ड्रोन कॅमेराचा सहायाने मगर किती आहे ? पिल्लू, किशोर वय अगर मोठी कसे काय ? समजण्यासाठी त्याच बरोबर तलावाचा कोणत्या दिशेने आहे हे सर्व जाणून घेण्यासाठी ड्रोन ची मदत घेण्यात आलीय मात्र संपूर्ण तलावात भरपूर पाणी, प्रचंड शेवाळे त्याच बरोबरीने चिखल रंग आणि मगरिंची शरीर रंग साम्य त्यातच ड्रोन कॅमेरा पंखेचा आवाज मुळे आणि सर्वात महत्व म्हणजे रात्री अंधार असल्याने ड्रोन कॅमेरा ला सुपर फ्लॅश प्रकाश जोडून तलावात उजड सोडल्याने सर्व मगर मिळेल त्या झूडपेत, दल दल चिकल भागात लपून राहिल्याने ऑपरेट स्क्रीन रेंज मध्ये मगरिंचा चित्र मुळीच दिसत नव्हते.. आखेर ती मोहीम थांबून दुसरा उपाय शोधून मगर या तलावातून काढण्याचा निर्णय घेण्यात आलय. दरम्यान वनक्षेत्रपाल शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शन खाली वनपाल डी. एस. सुभेदार यांनी वार्तालाप करताना आत्ता रेस्क्यू टीम बरोबर चर्चा विनिमय करुन लवकरात लवकर मगर या तालावातुन काढून जवळील नदीत न सोडता समुद्राचे खाडीत सोडण्याचे बाब सांगितले आहे...
