महाराष्ट्र वेदभुमी

नार्गाजुन शिव टेकळी व शिवतिर्थ अंबाळेश्वर धाम येथे महाशिवरात्री महोत्सव

सचिन चौरसिया प्रतिनिधी 

रामटेक :  रामटेक शहरासह ग्रामीण भागात भगवान शंकराचे दर्शन, पूजन व गीते झाली. यासोबतच ठिकठिकाणी शिवलिंगाचा अभिषेक, हवन पूजन व फराळाचा महाप्रसाद भक्तिभावाने पार पडला. भाविकांनी उपवास करून महाशिवरात्री महोत्सव साजरा केला. अतिसंवेदनशील समजल्या जाणाऱ्या नागार्जुन रेकडीवरील यात्रा शांततेत संपली. कारण यात्रे बाबत प्रशासन अलर्ट मोडवर होते. १२०  हून अधिक पोलीस कर्मचारी आणि होमगार्ड तैनात करण्यात आले होते. अप्पर ग्रामीण पोलीस अधीक्षक रमेश धुमाळ, उपविभागीय अधिकारी प्रियेश महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. डीवायएसपी रमेश बरकते, ठानेदार आसाराम शेटे, तहसीलदार रमेश कोळपे परिस्थितीवर लक्ष ठेवून होते...

सृष्टी सौंदर्य ग्रुपच्या वतीने शिवतीर्थ अंबाळेश्वर अंबाला येथे भजनाच्या कार्यक्रमाने हा उत्सव साजरा करण्यात आला. फराळी नास्ते व ताक वाटून उत्सव साजरा केला. धुम्रेश्वर शिवमंदिर, रामाळेश्वर शिव मंदिर, त्रिळभांडेश्वर मंदिर, अंबाळाचे अंबाळेश्वर धाम, नगरधनचे कोटेश्वर मंदिर, रामधाम सहित आदी मंदिरात दर्शनासाठी लोकांची झुंबड उडाली होती...

Post a Comment

Previous Post Next Post