अलिबाग : महाशिवरात्रीनिमित्त भाविकांचा उत्साह गगनाला.. हर हर महादेवचा जयघोष करत हजारो भाविक हे जिल्ह्यातील विविध मंदिरात दाखल झाले... महाशिवरात्र वर्षातील सर्वात महत्वाचा दिवस समजला जातो, त्याचनिमित्ताने पांडवकालीन ऐतिहासिक प्रख्यात मंदिर म्हणून ओळखले जाणारे श्री क्षेत्र चौल रामेश्वर मंदिरात महादेवाचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी उसळली होती... सुंदर फुलांनी सजलेले संपूर्ण मंदिराचे वातावरण भक्तिमय झाले होते...
हर हर महादेव या अखंड गजरात, स्मरण करत रामेश्वर शिवमंदिर परिसर, महाशिवरात्रीनिमित्त दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या गर्दीने फुलला होता... रात्री १० वाजता श्री रामेश्वर महाराजांची पालखी काढण्यात आली ही पालखी संपूर्ण चौल गावात फिरवण्यात येते... दरवर्षी लाखो भाविक महाशिवरात्रीनिमित्त रामेश्वर मंदिरात दर्शनासाठी येत असतात... येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी श्री रामेश्वर मित्र मंडळाकडून योग्य ती खबरदारी घेण्यातं येते... रामेश्वर मित्र मंडळाच्यावतीने मंदिर परिसरात स्वछता राखण्यात आली...
