महाराष्ट्र वेदभुमी

ग्रुप ग्रामपंचायत चाणजे हद्दीतील बालईतील चर्मकार वाडी,चव्हाणवाडी येथे गटार बांधकामाचे काम सुरु

संत रोहिदास विकास समितीच्या पाठपुराव्याला यश 

उरण दि २७(विठ्ठल ममताबादे):दिनांक २३/२/२०२५ रोजी सकाळी ११ वाजता संत रोहिदास विकास समितीची सभा बालई उरण येथे संपन्न झाली. या बैठकीस संत रोहिदास विकास समितीचे अध्यक्ष बाबल्या चव्हाण, उपाध्यक्ष नितीन चव्हाण, सचिव रवींद्र चव्हाण, सहसचिव दिनेश जानवळकर, खजिनदार विनोद सावर्डेकर, सहखजिनदार सचिन काजरोळकर, हिशोब तपासणीस जितेंद्र चव्हाण, सल्लागार सखाराम चव्हाण, सल्लागार बबन चव्हाण, सदस्य- नरेश चव्हाण, योगेश जानवळकर, योगेश चव्हाण, रणवीर विन्हेरकर, मनिष चव्हाण, रवि पेवेकर,महिला पदाधिकारी रुपाली चव्हाण,मृणाल चव्हाण,वर्षा पेवेकर,श्रीमती लक्ष्मी बबन चव्हाण व इतर महिला पदाधिकारी उपस्थित होत्या..

या बैठकीत विविध समस्या व त्यावर उपाययोजना संदर्भात चर्चा झाली. यावेळी बालई परिसरात गटार बांधकामाचे काम सुरु झाले आहे. संत रोहिदास विकास समितीच्या पदाधिकारी सदस्यांनी सह्यांची मोहीम राबवून चव्हाणवाडी /चर्मकारवाडी येथे बांधण्यात येणाऱ्या गटारा संदर्भात गटविकास अधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी रायगड जिल्हा परिषद अलिबाग, ग्रामसेवक चाणजे आदी ठिकाणी निवेदने दिली. संत रोहिदास विकास समितीच्या पाठपुराव्याला यश आले असून त्यांच्या मागण्या मान्य झाले असून बालई मध्ये  गटारांच्या कामाला सुरवात झाली आहे. सर्वप्रथम दिवंगत कै. बबन रामा चव्हाण (ग्रामपंचायत सदस्य चाणजे )यांनी सदर वस्तीची दलित वस्तीत नोंद व्हावी व सरकारच्या योजना चव्हाण वाडीला मिळावेत यासाठी प्रयत्न केले होते. त्यांच्या या मागणीला आता यश आले आहे. सदर कामाची पाहणी संत रोहिदास विकास समितीचे पदाधिकारी सदस्यांनी तसेच गावठाण चळवळीचे अभ्यासक राजाराम पाटील यांनी केले. सुरु असलेल्या या कामाचे सर्वांनी कौतुक केले.पावसाळ्यात बालई मध्ये मोठया प्रमाणात कचरा, सांडपाणी रस्त्यावर यायचा, तसेच कायमस्वरूपी गटारे नसल्याने नागरिकांनी टाकलेला कचरा घराबाहेर व रस्त्यावर पडून राहायचे आता मात्र गटार बांधण्यात येणार असल्यामुळे कचरा व सांडपाणीची कायमची विल्हेवाट लागणार आहे. त्यामुळे संत रोहिदास विकास समितीच्या पदाधिकारी सदस्यांनी तसेच नागरिकांनी प्रशासनाचे आभार मानले आहेत...

कोट (चौकट ):- 

जागेवर जाऊन आम्ही स्थळ पहाणी केली आहे. फेब्रुवारी महिन्यामध्ये सुध्दा मोठ्या प्रमाणात सांडपाणी रस्त्यावर वाहत आहे. येथील जागेनुसार या गटाराची रुंदी कमीत कमी तीन फुट, खोल तीन फुट व अंदाजे लांबी २५० फुट ओमकार अपार्टमेंट ते चव्हाण अपार्टमेंट, महाभद्रा निवास अशी असावी. गटाराच्या तळाला मजबूत आर.सी.सी. पाया असावा, दोन्ही बाजू आर.सी.सी. ने स्टील टाकून ४ इंच जाडीचे असावे, त्यावर ६ इंच स्लॅब पाहिजे. वरच्या बाजुने पूर्ण बंद करावे ते जाणे येणेचे लोकांच्या रहदारी चालणेसाठी सोयीचे होईल. कॉर्नर कॉर्नरवर आणि मधेमध्ये चेंबर असावेत. सुमारे १० चेंबर्स असावेत. काम सुरु केल्यापासून ३ महिन्यात पुर्ण करावे. कारण आमची रहाती घरे आहेत. अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वरील प्रमाणे काम करण्यात यावे. - राहुल चव्हाण, ग्रामस्थ, बालई

Post a Comment

Previous Post Next Post