महाराष्ट्र वेदभुमी

प्रवेश सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत

शिवभक्तांना २६ मार्च अंबाखोरीत एक दिवसीय निशुल्क प्रवेश

भाविकांनो, 'अंबाखोरी' मध्ये या महादेवाच्या दर्शनाला

सचिन चौरसिया प्रतिनिधी

रामटेक :- पेंच व्याघ्र प्रकल्प अंतर्गत तोतलाडोह जवळील अंबाखोरी देवस्थानात १९६८ पासून नित्यनियमाने दरवर्षी महाशिवरात्री निमित्य यात्रा भरते. अंबाखोरीत पुरातन शिव देवस्थान असून येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अंबाखोरी सेवा समिती चरिटेवल ट्रस्टच्या वतीने महाशिवरात्री उत्सवाचे आयोजन बुधवार दि. २६ फेब्रुवारी ला करण्यात आले आहे. वनविभागाच्या १९७२ च्या अटी व शतींसह ट्रस्टचे अध्यक्ष रामविलास शर्मा व अधिकाऱ्यांनी महाशिवरात्री उत्सवात महादेवाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या प्रवेशाची माहिती वनविभागाने दिली आहे. श्री अंबाखोरी तीर्थक्षेत्र हे जिल्ह्यातील प्राचीन व प्रसिद्ध तिर्थक्षेत्र आहे. मंत्रमुग्ध सौंदर्यासाठी प्रसिद्ध असलेले तीर्थक्षेत्र पेच राष्ट्रीय उद्यानाच्या घनदाट जंगलांच्या मध्यभागी वसलेले आहे. नदीच्या काठावर डोंगरावरून वाहणाऱ्या झऱ्यांमध्ये असलेल्या गुहेत भगवान भोले शंकर देहस्वरूपात विराजमान आहेत. योगसाधनेसाठी हे ठिकाण मानले जात असे. काही वर्षापुर्वीपर्यंत महाशिवरात्री उत्सव दोन दिवस साजरा केला जात होता. परंतु पेंच व्याघ्र प्रकल्प १९७२ च्या नियमांमुळे वनविभागाकडून भाविकांना एक दिवस दर्शन करण्यासाठी आत जाण्याची परवानगी दिली जात आहे...

प्रवेश सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत

या दिवशी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत भाविकांना प्रवेश मिळेल. वर्षभर येथे महाशिवरात्रीच्या दिवशीच भाविकांना प्रवेश मिळतो. त्यामुळे दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होते. तीर्थक्षेत्र राष्ट्रीय उद्यानात वसलेले असल्याने केवळ दुचाकी आणि तीन चाकी वाहनांना प्रवेश दिला जात नाही फक्त चारचाकी वाहणाणांचं प्रवेश दिला जातो  . सिल्लारी अंबाखोरी रस्त्यावरूनच भाविकांना प्रवेश मिळेल... पॉलिथिनच्या पिशव्या, ढोल ताशे, टाळ, मृदंग, लाऊडस्पीकर व इतर कोणतेही वाद्य व्याघ्र प्रकल्पात नेण्यास व मुक्काम करण्यास मनाई आहे... महाशिवरात्रीच्या दिवशी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घालून दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे, असे आवाहन अंबाखोरी सेवा समिती चेरिटेबल ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post