अनेक क्षेत्रातील दिग्गज व्यक्तिमत्व यांना सभेस खास आमंत्रण.
अध्यक्ष जयवंत दरेकर यांच्या नेतृत्वाखाली विशेष सभा आयोजन.
रायगड:-(नरेश पाटील): राज्यातील अत्यंत प्रतिष्टीत असलेल्या कोंकण विकास समितीचे कार्यकारिणी सदस्य आणि इतर सर्व सदस्य यांची विशेष सर्वसाधारण सभा संभाजी सांस्कृतिक हॉल, संभाजी गार्डन जवळ, मुलुंड चेक नाका लगत, मुलुंड ( पूर्व ), मुंबई ४०० ०८१ या ठिकाणी शनिवार दिनांक ०८ फेब्रुवारी २०२५ रोजी सायंकाळी ०४.०० वाजता संपन्न होणार आहे...
सदर नामांकित संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी वरिष्ठ पोलीस अधिकारी जयवंत दरेकर यांच्या प्रमुख उपस्थित संपन्न होणार आहे... या वेळी तमाम पदाधिकारी, सदस्य, कार्यकर्ते उपस्थित राहणार आहे. दरम्यान मा. दरेकर यांनी वार्तालाप करताना सांगितले की या सभेत कोकणाचा विकासबाबत
१) कोंकण विकास समितीचे भविष्यकालीन विकासकामांचा आढावा - अंदाज घेऊन जिल्हा निहाय तसेच तालुकानिहाय प्रमुख पदी नियुक्ती होणेसाठी चर्चा व नेमणूक करणे...
२)कोंकण विकास समितीचे प्रस्तावांचा मंत्रालय तसेच इतर शासकीय कार्यालयांत पाठपुरावा करणेसाठी समन्वय प्रमुख यांची नियुक्ती करणे...
३)कोंकण विकास समितीचे पाठपुरावा अंतर्गत नवीन संकल्पना, नवीन योजना, सूचना, बदल याचे नियोजन करणेसाठी नियोजन प्रमुख नियुक्त करणे...
४)कोंकण विकास समितीचे अंतर्गत कोंकण विकास महोत्सव साजरा करताना कला, क्रीडा, संशोधक, नृत्य, कलाकृती, खाद्य - संस्कृती, खाद्य व्यावसायिक , गृह पाहुणचार व्यावसायिक ( होम स्टे व्यावसायिक ), कोकणची संस्कृती - चालीरिती जनसामान्यांपर्यंत पोहचविणारे - त्यास प्रसिद्धी देणारे, कोंकण मेवा, कोंकण संस्कृती, कोंकणातील भूमी उद्योजक, समाज विकलांग विकास संस्था, कोळी - आदिम - वारली संस्कृती, सामाजिक दिशा देणारा संत इत्यादी विषयांचा अंतर्भाव करता येईल का यावर चर्चा करून निर्णय घेणे...
५) कोंकण विकास समिती अंतर्गत मुंबई टाटा मॅरॅथॉन धर्तीवर कोंकण मॅरॅथॉन चे आयोजन करणे संबंधात चर्चा करून निर्णय घेणे...
अश्या विविध प्रमुख मुद्दे घेऊन कोकणाचे सर्वांगीण विकास साधण्याचे उद्दिष्ठ ठेवले आहे... या दरम्यान अध्यक्ष जयवंत दरेकर यांनी कोंकण विकास समिती व्हाट्सअप ग्रुपवर असणारे सदस्य, कोंकणातील वेगवेगळे संस्थांचे अध्यक्ष, पदाधिकारी त्याचप्रमाणे ग्रुपवरील सदस्यांचे गावातील, नात्यातील, ओळखीचे राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू, कला - गायक, आर्टिस्ट, संशोधक, सायंटिस्ट, कोंकणातील गृह पाहुणचार व्यावसायिक (होम स्टे व्यावसायिक), कोकणची संस्कृती - नैसर्गिक चालीरीती जनसामान्यांपर्यंत पोहचविणारे - त्याला राज्यात, देशात तसेच जगाचे बाजारपेठेत प्रसिद्धी मिळवून देणारे, कोंकण मेवा तसेच कोकणचे खवय्ये पदार्थांची विक्री करणाऱ्या कोंकणी व्यावसायिकांना, कोंकणातील भूमी उद्योजक यांना, सामाज विकलांग विकास संस्था चालक, कोळी - आदिम - वारली संस्कृती जोपासणाऱ्या संस्था, सामाजिक हित आणि कोकणची सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या सर्वच संस्था अगर व्यक्ती यांनी या सभेत येण्याची अथवा त्यांचा कोंकण महोत्सव दरम्यान सहभाग असावा म्हणून खास निमंत्रित केले आहे...
यादरम्यान कोंकणातील प्रत्येक सकारात्मक सदस्यांनी खऱ्या अर्थाने सक्रिय सहभाग घेतला तर कोंकण विकास महोत्सव आणखी देखणा घडवून आणता येईल हा यामागचा उद्देश आहे... कोंकण विकास समितीचे प्रत्येक सदस्यानी आपण स्वतः या कोंकण विकास महोत्सवाचे यजमान आहात असे समजून सहभाग नोंदवावा व आपला अमूल्य सल्ला, सूचना कराव्यात अशी अंती पुष्ठी जोडले आहे... यादरम्यान कोकण विकास समितीचे अध्यक्ष आदरणीय जयवंत साहेब व त्यांचे पदाधिकारी कोकणातील भेदसावणारे अनेक समस्या जसे कोंकण रेल्वे ची जलद गाडी, धिमी गाडी, अतिरिक्त गाडी, विशेष गाडी, हॉलिडे स्पेशल, सणा सुधी काळात विशेष आरक्षित, विनाअरक्षित, अतिरिक्त डब्बा जोडणे, प्रमुख थांब, कोकणातील तिनी जिल्ह्यात लांब पल्ल्याचे कमीत कमी दोन प्रमुख स्थानकात रेल्वे ची थांब मिळणे... पुढे कोकणाचा रसत्यावरील रखडलेला अत्यंत महत्वाचे राष्ट्रीय महामार्ग क्र. 66 अर्थातच मुंबई गोवा महामार्ग काम जलद गतीने पूर्ण होण्यासाठी अध्यक्ष जयवंत दरेकर यांनी विशेष लक्ष देऊन शासन दरबारी पुढाकार घेत पूर्णतःव कडे नेण्याची चांग बांधत आहे... तसेच याच महामार्गवर वनिकरण करीता मंत्री महोदय मार्फत वृक्ष लागवड प्रस्ताव सादर करुन गेल्या वर्षी चालना दिल्याने आत्ता त्याला चांगली गती मिळवून दिल्याने महामार्गतील अनेक ठिकाणी फुलून निघाले आहे.. तसेच महामार्गचे दोन्ही बाजू कडेला विविध फळाचे वृक्ष लागवाड करण्याचे मागणीलाही शासन प्रतिसाद देऊन मंजुरी दिल्याची दिसत आहे.. तर तर अनेक कोकण सामाजिक उपक्रमास ही कोकण विकास समिती पाठपुरावा करीत असल्याचे दिसत आहे तर उद्या शनिवारी रोजी पार पडणारा विशेष सभेची जोरदार तयारी होताना दिसत आहे...
