महाराष्ट्र वेदभुमी

रानडुकराला मिळाले जीवनदान



शिकार आणि शिकारी दोघेही पडले विहिरीत

सचिन चौरसिया प्रतिनिधी 

रामटेक:- देवलापारच्या सीमावर्ती पिपरिया भागाजवळ असलेल्या मध्यप्रदेशातील घटना सोमवारी संध्याकाळी एका दुर्मिळ आणि नाट्यमय घटनेत, वाघ रानडुकरची शिकार करण्याकरिता त्याचा पाठलाग करीत असतांना वाघ व रानडुक्कर शेतातील विहिरीत पडले... हा असामान्य प्रकार घडला...येथे 'शिकारी आणि शिकार' दोघेही एकाचं ठिकाणी आपला जीव वाचवण्यासाठी वाट पाहताना दिसले... या वाघाला आणि रानडुक्कराला पाहण्यासाठी विहिरीभोवती गावकऱ्यांनी गर्दी केली...

वनविभागाने वेळीच दाखल होत दोन्ही वन्यप्राण्यांचे रेस्क्यू करीत त्यांची सुटका केली... त्यानंतर वाघ व रानडुकराने जंगलात एकच धूम ठोकली...

पिपरिया-कुरई, जि. शिवनी येथे एक वाघ रानडुकराची शिकार करण्याकरिता त्याचा पाठलाग करीत असताच्या दरम्यान पिपरिया ते हरदोली मार्गावर किशोर भलावी यांचे शेत आहे... याच परिसरात अचानक दोन्ही समतल विहिरीत पडले... विहिरीत पडल्यानंतर वाघाने डुकराची शिकार करण्याऐवजी स्वतःचा जीव वाचविण्यावर लक्ष केंद्रित केले... दोघेही शेजारी शेजारी जीव वाचविण्यासाठी धडपड करीत होते... ते चक्राकार पोहोत होते. ही बाब बघण्यासाठी प्रत्यक्षदर्शींनी मोठी गर्दी केली होती... काहींनी व्हिडीओ समाज माध्यमांवर टाकल्याने हा कुठला प्रसंग म्हणून महाराष्ट्रातील वनविभाग अलर्ट मोडवर आला... तेथील वनविभागाच्या प्रयत्नाने जीव वाचला खरा, अन्यथा वाघोबासह रानडुकराचा जीव गेला असता..

Post a Comment

Previous Post Next Post