महाराष्ट्र वेदभुमी

पारंपारिक वेशात शोभा यात्रा प्रभादेवी खाडा ८९ वर्ष

 


मुलुंड प्रतीनीधी सतिश वि.पाटील :- आगरी सेवा संघ प्रभादेवी आगरी महोत्सव यांनी मला श्री सतीश विष्णू पाटील पत्रकार म्हणून गौरवण्यात आहे त्या बद्दल समस्त आगरी समाज बांधव यांचे मनापासून आभार...

प.सा.काका म्हात्रे ख्यातनाम ज्येष्ठ कवी आणि आगरी सेवा संघ प्रभादेवी अध्यक्ष यांचे मनापासून आभार..


 या सुंदर अशा कार्यक्रमाचे आयोजक आगरी समाज संघ ची स्थापना १९३५  झाली असुन दर वर्षी आगरी महोत्सव मोठ्या थाटात व उत्साहात होता दर वर्षी मोठ्या दिमाखात साजरा करण्यात येतो अनेक समाज बांधव वेगवेगळी वेशभूषा करून  वाजत गाजत प्रभादेवी खाडा परिसरात एकदेवीची पालखी मिरवणूक काढण्यात येते अनेक व्यवसायिक व स्थानिक आपापल्या परिसरात नाष्टा,शितपेय याची व्यवस्था नित्यनियमाने करतात दोन कार्यक्रम चालतो पहील्या दिवशी सार्वजनिक सत्यनारायण पुजा आयोजीत असते व दुसर्‍या दिवशी पारंपारिक वेशात शोभा यात्रा काढण्यात येते एक भरगच्च कार्यक्रम राबविण्यात येतो तोही मुंबई -दादर विभागात त्यावेळी विभागातील पोलीस देखील चांगले सहकार्य करीत असतात आगरी सेवा संघ अध्यक्ष माननीय श्री.प सा.काका म्हात्रे नामवंत कवी सरचिटणीस श्री.सुभाष भाऊ ठाकूर, कोषाध्यक्ष श्री.चंद्रकांत काका पाटील उपाध्यक्ष श्री.कृष्णा दादा पाटील उपाध्यक्ष डॉ.श्री.साजन पाटील,श्री.संकेत पाटील.आणि सर्व संघटनेच्या पदाधिकारी एकजुटीने कार्यक्रम राबविण्यात अथक मेहनत घेतात संध्याकाळी विभागातील व इतर भागातील शिक्षणक्षेत्रात, व्यवसायिक, पत्रकार,लेखक,कलाकार अशा दिग्गज लोकांचा मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात येतो व पाहुण्यांची भोजन व्यवस्था केली जाते सर्व कार्यकर्ते व  सदस्यांचे यांचे कौतुक करावे तेवढे  कमीच आहे ...

Post a Comment

Previous Post Next Post