श्रीवर्धन:-(नरेश पाटील): पिण्याच्या पाणी अर्थातच जल वचनपूर्ती शब्दाचे लोकार्पण त्याचबरोबरिने सभागृह पायभरणी कार्यक्रम मंगळवारी दि.18 फेब्रुवारी, 2025 रोजी कोकणाचे काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते मा.आ. स्व. मधुकर ठाकूर यांचे सुपुत्र राजेंद्र मधुकर ठाकूर यांच्या उपस्थितीत संपन्न झाला...
सदर सामाजिक उपक्रम श्रीवर्धन तालुक्यातील निगडी येथे जल लोकार्पण तर बोर्ली पंचतन जवळील वडवली गाव येथे सभागृह पायभरणी उपक्रम पार पडले... यावेळी राजा भाऊ ठाकूर समवेत राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गटातील रायगड जिल्हा सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा अध्यक्ष सदानंद येलवे, रायगड जिल्हा काँग्रेस पक्षाचे सचिव डॉ. नरेंद्र सिंग, माणगाव ता.अध्यक्ष विलास सुर्वे,म्हसळा न.पंचायत काँग्रेस नगरसेवक सुफियान हलदे,श्रीवर्धन ता.काँग्रेस उपाध्यक्ष इम्तियाज कोकाटे,सचिव गणपत गमरे,रक्षित सामाजिक संघटनेचे अध्यक्ष शशिकांत पवार,कार्यकर्ते अशोक जाधव,मनोज जाधव,दिनेश खैरे,सज्जड सरखोत,इमाद उलडे,शांतराम मळकेर,माजीद सुभेदार,अशफाक काजेवाडी,एजाज घरटकर त्याच बरोबर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते...
दरम्यान राजा भाऊ ठाकूर यांनी निगडी गावात पिण्याच्या पाण्याची सुमारे दहा हजार लिटर क्षमता असलेल्या सिन्टेक्स टाकी,टाकीकरीता सिमेंट काँक्रेट प्लॅटफॉर्म त्याचबरोबरीने पाईप लाईन जोडणी आपला वडील काँग्रेस पक्षाचे स्व.मधुकर ठाकूर यांच्या स्मरणार्थ लोकार्पण केले....तर श्रीफळ वाढवून तसेच नामफलकाला माळा अर्पण करुन शानदार उदघाटन तसेच ऋण व्यक्त कार्यक्रम पार पडले... यानंतर वडवली गाव येथे "श्री शिवरदेवआळी" वडवली सामाजिक सभाग्रहचे सुमारे दहा लक्ष रुपये कामाचा भूमिपूजन सोहळा कार्यक्रम सायंकाळी संपन्न झाला... यावेळी ग्रामस्थ यांनी राजा भाऊ ठाकूर यांचे जंगी स्वागत करुन सत्कार तसेच औक्षण करुन दिलेल्या शब्दाला कृतज्ञता व्यक्त करुन आपण उदघाटन कार्यक्रमास आपल्याच उपस्थितीत संपन्न होतील म्हणून सांगितले...

