मुलुंड प्रतिनीधी : सतिश वि.पाटील
"संभाजी राजांवर हल्ला करणारे पात्र स्वप्नातही शक्य नाही"- बाळा पाटील
"छावा"चित्रपट सबंध हिंदुस्थानभर प्रचंड गाजतोय...मोघलांनी केलेले अत्याचार...तसेच सह्याद्रीच्या छाव्याला दिलेल्या यातना पहिल्यांदाच सिनेपडद्यावर अनुभवायला मिळालं...हे बलिदान पाहून रसिकांच्या अश्रूंचा बांध फुटला... पहिल्यांदाच बॉलीवूडमध्ये कुणी दाखवायचं हे धाडस केलं...प्रत्येक कॅरेक्टरमध्ये हर एक कलाकाराने जीव ओतून काम करण्याचा प्रयत्न केला...संभाजी राजांची भूमिका विकी कौशल अक्षरश: जगले...अक्षय खन्ना या कलाकाराने औरंगजेब तितक्याच ताकदीने उभा केला...
सर्वच काबीले तारीफ..
पण या चित्रपटाच्या सेटवरील वातावरण शंभूमय होण्यासाठी चित्रीकरणाआधी दिली जाणारी "संभाजी महाराज की जय" ही गारद दर दिवशी सेटवर प्राण फुंकत असे.... ही गारद देणारा कला दिग्दर्शक बाळा पाटील हा सर्वसामान्य आगरी कोळी कुटुंबातील पालघर जिल्ह्यातील वैतरणा गावातील...
मुळात ही संकल्पना कुठून आली.... आणि ही गारद दिल्यानंतर मुख्य कलाकारांना कुठली कुठली अनुभूती यायची? हे या चित्रपटाचा अविभाज्य भाग असलेल्या बाळा पाटील यांची मेहनतीचे फळ म्हणजेच "छावा" चे अभिनंदन सर स्थरांतून होत आहे...
