सचिन चौरसिया प्रतिनिधी
रामटेक :- विदर्भ वनवासी कल्याण आश्रम ची प्रांत नियोजन बैठक अखिल भारतीय युवा कार्य प्रमुख श्री.वैभवजी सुरंगे व क्षेत्र संघटन मंत्री श्री.अनिलजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली देवलापार जिल्हा नागपूर येथे २२,२३ फेब्रुवारी रोजी संपन्न झाली... या बैठकीत जिल्हा व प्रांत कार्यकारिणी आयाम प्रमुख पुर्णकालीन असे सर्व ६० कार्यकर्ता उपस्थित होते... दोन दिवसीय बैठकीमध्ये सप्तबिंदुवर चर्चा करून जिल्हा स्थानापासून ते ग्राम स्थानापर्यंत त्रैवार्षिक योजना करण्यात आली... ७ सत्रामध्ये ही बैठक घेण्यात आली... जनजाती समाजाचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर ग्रामसमिती सक्रिय होणे आवश्यक आहे तसेच आपले लक्ष प्राप्त करण्यासाठी सेवानिवृत्त व्यक्ती, अंशकालीन, पुर्ण कालीन, विस्तारक योजना प्रामुख्याने राबवावी असे क्षेत्र संघटन मंत्री श्री.अनिलजी पाटील यांनी आव्हान केले... समारोप सत्रा मध्ये आपले सर्व स्पर्शी काम व्हावे तसेच नियोजन हे सर्व समिती समोर ठेवून पालक योजना राबवावी व परिणाम कारक कार्य करावे असे समारोपीय सत्रामध्ये श्री.वैभवजी सुरंगे यांनी मार्गदर्शन केले... याप्रसंगी प्रांत सहसचिव श्री.अनिलजी मरसकोल्हे सहसचिव सौ.नितताई किटकरू प्रांत संगठन मंत्री श्री.रमेशजी आत्राम तसेच १५ जिल्ह्यातील समिती प्रतिनिधी अंशकालीन पूर्ण कालीन व आयाम प्रमुख उपस्थित होते...
