महाराष्ट्र वेदभुमी

महाराष्ट्राची हिरकणी कु .शर्विका म्हात्रे; १२१ हून अधिक अवघड किल्ले सर

 

मुलुंड प्रतिनीधी : सतिश विष्णू पाटील 

मुख्यमंत्री आदेशानुसार त्याच्या  शिष्टमंडळातील काही अधिकारी व महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष आ. रवींद्र चव्हाण आणि आ. प्रशांत ठाकूर तसेच मंत्रिमंडळातील अधिकारी लाल दिव्याची गाडी घेऊन थेट कु.शर्वरी म्हात्रे हीला निवास स्थानी भेट दिली.त्यांनी शर्वरीच्या पुढील वाटचालीबद्दल आईवडील यांच्या बरोबर चर्चा केलीय...

मुर्ती लहान पण किर्ती महान अशी ख्याती..

अवघ्या सात वर्षांच्या चिमुकलीने १२१ हून अधिक अवघड किल्ले सर केले छत्रपतींचा इतिहास जाणून घेण्याची तीची तळमळ इतरांना प्रेरणादाई ठरेल.. यंदा २६ जानेवारीच्या संध्येला सर्वांत उंच कठीण लिंगाणा किल्ला सर करत आणखी एक विक्रम रचला... अशाच धाडशी पराक्रमामुळे शर्वरी महाराष्ट्र हिरकणी व जागतिक विक्रमवीर म्हणून ओळखले जाते...तिला लाभलेले संस्कार कमी वयात गडकिल्ले सर करणारी आगरी समाजाचे नाव उज्ज्वल करणारी व आपला पराक्रमी इतिहास जपण्याचा एक छंद जपणारी शर्विका  ही चिमुकुली आहे.. तिच्या कुटुंबासोबत आ. रवींद्र चव्हाण, आ. प्रशांत ठाकूर, एँड. महेश मोहिते व पनवेल शहरातील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या....

Post a Comment

Previous Post Next Post