पारशिवनी तालुक्यातील दुसरी घटना नरभक्षी वाघाचा आतंक वाढला
नरभक्षी वाघाने घेतला शेतकऱ्यांच्या नरडीचा घोट
सचिन चौरसिया प्रतिनिधी
रामटेक :- पारशिवनी वनपरिक्षेत्र अंतर्गत शेतकऱ्यांना ठार करणाऱ्या नरभक्षी वाघ अजूनही मोकाट आहे... त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संताप आहे... पारशिवनी वनपरिक्षेत्रातील कोंडा सावळी या गावातील दशरथजी धोटे वय अंदाजे ६० वर्ष या शेतकऱ्यांचा दिनांक २१ फेब्रुवारी ला शेतातून गावाकडे येत असताना नरभक्षी वाघाने अचानक हल्ला करून शेतकऱ्यांच्या नरडीचा घोट घेत आपल्या पोटाची खळगी भरली...
पारशिवनी तालुक्यातील ४८ गावांमध्ये पट्टेदार वाघाने आपली दहशत कायम ठेवली आहे... १२ जानेवारीला शेतात तुर कापणी करत असताना आमगाव येथील सहदेव सुर्यवंशी या शेतमजूराच्या नरभक्षी वाघाने अमानुष पणे ठार केले होते... तर पेठ परसोडी येथील शेतकरी चंद्रशेखर इंगळे यांच्यावर हल्ला करून जखमी केले होते... या घटनेनंतर दिनांक २१ फेब्रुवारीला पारशिवनी वनपरिक्षेत्रातील कोंडा सावळी येथील शेतकरी दशरथजी धोटे हे आवळेघाट येथुन आपल्या शेतात गेले पण मुलाने त्यांना घरी जाऊन आराम करा असे वडील दशरथजी ढोरे यांना सांगितले... दशरथजी ढोरे हे घरी जाण्यासाठी निघाले पण रस्त्यात त्याना संडास लागली म्हणून ते बसले असताना दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक हल्ला चढवला... ते ओरडले असता जवळ असलेल्या शेतातील मुलगा धावत आला... समोरील दृश्य पाहून त्यांनी सुध्दा मदतीसाठी टावो फोडून ओरडून मदत मागितली... पण नरभक्षी वाघाने मुलांच्या डोळ्यासमोरच त्यांच्या वडिलांना ५० फुटापर्यंत फरफटत नेले...
अखेर गावकरी आले
गावातील नागरिक आले असता नरभक्षी वाघाने जागा सोडली व गावातील नागरिक यांनी तातडीने पारशिवनी पोलीस व वनपरिक्षेत्र अधिकारी अनिल भगत यांना घटनेची माहिती दिली... मात्र घटना स्थळी अधिकारी कर्मचारी पोहोचण्यासाठी निघाले आहेत... नरभक्षी वाघाला पकडण्यासाठी वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली, पण नरभक्षी वाघाला पकडण्यास अपयश आले... आमगाव शिवारात दोन म्हैस बांधून नरभक्षी वाघाला पकडण्यासाठी सापळा रचला पण वाघाने एक म्हैस फस्त करून वनविभागाच्या हातावर तुरी देऊन पसार झाला...
हे सर्व कॅमेरामध्ये टिपले आहे...
वाघाला सुर्यास्तानंतर पकडले जाऊ नये असे वरिष्ठ अधिकारी यांनी स्पष्ट सुचना दिल्या होत्या... परिणामी नरभक्षी वाघाने यांचं संधीचा पुरेपूर फायदा घेत पुन्हा कोंडा सावळी येथील शेतकरी दशरथजी धोटे यांच्या नरडीचा घोट घेतला...
३३ दिवसा नंतर......
पत्रकार संघाचे अध्यक्ष भुजंग ढोरे यांच्या पाठपुरावा केला व अखेर नरभक्षी वाघाला पकडण्याची वरिष्ठ अधिकारी यांनी 33 दिवसानंतर परवानगी दिली... पण वाघ मध्ये दिसत नसल्याने व वाघाने दर्शन देणे बंद केल्याने नरभक्षी वाघाला पकडण्याची मोहीम थंडावली होती... पण आज कोंडा सावळी येथील शेतकरी दशरथजी धोटे यांच्या नरडीचा घोट घेत नरभक्षी वाघाने पुन्हा आपल्या अस्तीत्वाचा परीचय दिला आहे...
