महाराष्ट्र वेदभुमी

चोंढी पंचक्रोशीत माघी गणेश जयंती उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न

सोगाव - अब्दुल सोगावकर: अलिबाग तालुक्यातील चोंढी पंचक्रोशीत शनिवार दि. १ फेब्रुवारी २०२५ रोजी माघी गणेश जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली, काही ठिकाणी मध्यरात्रीपासूनच गणेश मंदिर परिसर उजळून निघाला होता, तर काही ठिकाणी सकाळपासूनच गणेश भक्तांनी दर्शनासाठी व प्रसादासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती... या माघी गणेश जयंतीला तिलकुंद चतुर्थीदेखील साजरी केली जाते... या दिवशी बाप्पाच्या प्रसादात जास्तीत जास्त तिळाचा वापर करण्यात येतो... 

       माघी गणेश जयंती उत्सवनिमित्ताने या भागातील सर्व गणेश मंदिरात भगवान गणेशाची विधिवत पूजाअर्चा करण्यात आली. चोंढी पंचक्रोशीतील मापगाव, बहिरोळे, मुनवली, चोंढी, किहीम, बामणसुरे, सातिर्जे आदी गावातील बहुतांश ठिकाणी मोठ्या भक्तिभावाने साजरी करण्यात आली... यावेळी सकाळी आरती झाल्यानंतर प्रसाद, महाप्रसाद तर दुपारनंतर हळदीकुंकूसह महिलांचे व लहान मुलामुलींचे विविध सांस्कृतिक व आध्यात्मिक व करमणुकीचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते... यासोबतच श्री. गणरायाला विविध प्रकारचे नवस करणे व फेडणे असे कार्यक्रम संपन्न झाले, तसेच भजन, किर्तन असे अध्यात्मिकसह विविध प्रकारचे कार्यक्रम देखील मोठ्या प्रमाणात आयोजित करण्यात आले होते....संध्याकाळी महाआरतीनंतर ही अनेक ठिकाणी भजनांच्या स्पर्धा घेण्यात आल्या होत्या... दिवसभर गणेश मंदिरात सर्व स्तरातील मान्यवर व गणेश भक्तांची दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली... एकंदरीतच चोंढी पंचक्रोशीत माघी गणेश जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली...

    मुनवली येथे रात्री भजनांचे कार्यक्रम झाल्यानंतर लहान मुलांचे सांस्कृतिक व करमणुकीचे कार्यक्रम घेण्यात आले. या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित मुनवली गावची सुकन्या ऍड. प्रतिक्षा वारंगे(वडे) यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. ऍड. प्रतिक्षा वारंगे(वडे) या पनवेल येथील न्यायालयात सरकारी अभियोक्ता म्हणून आपले कर्तव्य पार पाडत आहेत... त्यांनी नुकत्याच कळंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. १२५/२०१५ भा.द.वी. ३७६(१) नुसार पोक्सो ४ वै. मध्ये सरकार पक्षातर्फे उत्कृष्ट बाजू मांडून आरोपीस दोषसिद्धी मिळवून प्रथम क्रमांक पटकावला, याबद्दल महाराष्ट्र पोलीस तर्फे पोलीस आयुक्तालय नविमुंबई यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले आहे... ऍड. प्रतिक्षा वारंगे(वडे) यांनी न्यायालयीन प्रकरणात यापूर्वीही अनेक कौतुकास्पद कामगिरी केल्याबद्दल अनेक पुरस्कार प्राप्त केले आहेत... आपल्या गावाचे नाव उज्वल केल्याबद्दल मुनवली पंचक्रोशीतील महिला व पुरुष ग्रामस्थांनी त्यांचा या माघी गणेश जयंती उत्सव निमित्त कार्यक्रमात भव्य सत्कार केला, तसेच त्यांच्या हस्ते सांस्कृतिक व करमणुकीच्या कार्यक्रमात सहभागी सर्व कलाकारांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले...

फोटो लाईन : माघी गणेश जयंती निमित्त मुनवली येथील गणेश मंदिरात दर्शनासाठी आलेल्या गावची सुकन्या ऍड. प्रतिक्षा वारंगे(वडे) यांचा सत्कार करताना मुनवली ग्रामस्थ,

Post a Comment

Previous Post Next Post