सोगाव - अब्दुल सोगावकर : अलिबाग तालुक्यातील सोगाव येथील ड्रायव्हर आसिफ(पप्पा) आदम मिरकर (वय ३३) यांचे शुक्रवार दि. ३१ जानेवारी २०२५ रोजी मध्यरात्री ३:३० वाजता पनवेल - कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू असताना अल्पशा आजाराने निधन झाले आहे... याबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे...
नेहमी हसतमुख व मनमिळाऊ स्वभावाचे असणारे आसिफ मिरकर हे मिळेल त्या वाहनांवर ड्रायव्हर म्हणून काम करत आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते... त्यांच्या पश्चात वृद्ध आई, वडील, १ भाऊ, १ बहीण, पत्नी, एक चार वर्षीय व एक दोन महिन्यांचा असे दोन लहान मुले आहेत... त्यांच्या अंत्यदर्शनासाठी व अंत्यसंस्कारावेळी विविध क्षेत्रातील अनेक राजकीय व सामाजिक, उद्योजक, नातेवाईक तसेच सर्व समाजातील मित्रपरिवार आणि पंचक्रोशीतील सर्व स्तरातील महिला व पुरुष ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते... त्यांच्या आकस्मित निधनाने त्यांच्या कुटुंबासह मित्रपरिवांरांना मोठा धक्का बसला आहे...
