रोहा-अष्टमी शहरातील मुस्लिम महिलांनी नगर परिषद व विद्युत वितरण कार्यालयात दिले निवेदन...
शहानवाज मुकादम/रोहा मो.७९७२४२०५०२.
रोहा:मुस्लिम समाजाचा पवित्र रमजान महिना दि: ०१ मार्च २०२५ पासून सुरू होत आहे...सदरच्या रमजान महिन्यात लहान मुले, स्त्रिया, वयोवृद्ध मुस्लिम बांधव असे सर्व उपवासात ( रोज्यात ) असतात...
मार्च महिन्यात भरपूर प्रमाणात उन्हाळा आसलेने पाण्याची व विद्युत पुरवठ्याची जास्त आवश्यकता असते... मार्च महिन्यात उष्णता मोठ्ठया प्रमाणात उष्णता असुन शहरातील सर्व नागरिकांना पाणी पुरवठा आणि विद्युत पुरवठा सुरळीत व नियमित मिळण्याची आवश्यकता असते...
त्यातच रमजान सारख्या पवित्र महिन्यात उपवास ठेवणे कामी मुस्लिम महिला मध्य रात्रीच आपापल्या कुटुंबातील लोकांसाठीच जेवणाची म्हणजेच सहरी ची तयारी करतात, तसेच सदरचा उपवास हा सुमारे पहाटेच्या ०५ वाजता पासुन ते संध्याकाळी ०७ वाजेपर्यंत असते... दुपारी दोन वाजल्या पासुन मुस्लिम महिला ह्या उपवास सोडण्याची म्हणजेच ईफतारीच्या तयारीला लागतात...
अश्या प्रकारे मुस्लिम महिलांची रमजान महिन्यात पुर्ण ३० दिवस खुपच मेहनत आसते... ईफतारी साठी रोजच वेगवेगळे पदार्थ बनवण्यात येते, मुस्लिम धर्मासाठी पुर्ण वर्षातील सर्वात महत्वाचा रमजानचा पवित्र महिना असुन या महिन्यात जास्तीत जास्त अल्लाहची आठवण करणे, पाच वेळेस नमाज आदा करणे, कुराण पठण करणे, प्रार्थना करणे हे महत्त्वाचे असते...
रोहा-अष्टमी शहरातील मुस्लिम महिलांनी केलेल्या विनंती अर्जाची दखल नगर परिषद रोहा आणि विद्युत वितरण विभागाकडून घेऊन पाणी पुरवठा व विद्युत पुरवठा सुरळीत व नियमित मिळावा अशी मागणी करण्यात आली आहे...
तसेच रमजान महिन्यात भारनियमन रद्द करुन विद्युत पुरवठा सुरळीत चालू ठेवावा अशी ही मागणी श्रीम, साजिया बिलाल मोरबेकर आणि महिलावर्ग मुस्लिम समाज रोहा-अष्टमी यांच्या तर्फे करण्यात आली आहे...
