पाली वार्ताहर: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने मा. खासदार श्री. सुनिलजी तटकरे साहेब यांच्या संकल्पनेतून तसेच मा. ना. कु. अदितीताई तटकरे आणि मा. आमदार अनिकेतभाई तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली हजारो महिलांच्या उत्स्फूर्त सहभागात सुधागड-पाली तालुक्यात “आदि ‘ती’ महोत्सव” भव्यदिव्य स्वरूपात संपन्न झाल..
या खास सोहळ्यात हळदी-कुंकू समारंभ, मराठी लोकगीतांचा ऑर्केस्ट्रा, नृत्याविष्कार, लकी ड्रॉ, पैठणी बक्षिसे आणि महिलांसाठी विशेष भेटवस्तू अशा अनोख्या आकर्षणांनी उपस्थित महिलांचा आनंद द्विगुणित केला..महोत्सवाचे विशेष आकर्षण प्रसिद्ध सिनेअभिनेत्री मधुराणी गोखले-प्रभुलकर यांच्यासोबत महिलांनी मनमुराद गाण्यांच्या तालावर ठेका धरत जल्लोष साजरा केला...
या उत्सवाला मोठ्या संख्येने महिलांनी उपस्थित राहून आनंद लुटला.. सर्व महिलांचे मनःपूर्वक आभार!

