महाराष्ट्र वेदभुमी

रिक्षा चालक मिलिंद लहाने यांच्या कन्येची दक्षिण कोरियात मर्चंट नेव्हीमध्ये नियुक्ती.

पुगाव खांब (नंदकुमार कळमकर) रोहा तालुका तसेच खांब कोलाड विभागातील मौजे पुगाव येथील रिक्षा चालक मिलिंद लहाने यांची सुकन्या कु.तनवी मिलिंद लहाने हिची मर्चंट नेव्हीमध्ये दक्षिण कोरियात   नियुक्ती झाली असल्याने तालुक्यासह जिल्ह्यातून तिच्यावर अभिनंदनाचा व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे...

तनवीचे वडील रिक्षा चालक तर आई गृहिणी असुन तन्वीचा शांत आणि प्रेमळ स्वभाव त्यामुळे प्रत्येक आई-वडिलांच्या मनात असते, आपली मुलगी मोठी व्हावी हे स्वप्न अंगी बाळगणाऱ्या आई वडिलांचे स्वप्न मुलीने सत्यात उतरून पूर्ण केले... ग्रामीण भागात शिक्षण घेत तनवीचे प्राथमिक शिक्षण हे कोलाड येथील महात्मा फुले संस्था. येथे दहावीपर्यंत झाले.. तर पुढील  शिक्षण कोलाड हायस्कूल येथे पूर्ण झाले, तिच्यातील जिद्द चिकाटी व अथक परिश्रमाने तनवीने नेहमीसारख्या यशाचे शिखर गाठत तिने मिळवलेल्या यशाचे आज तिची तालुक्यात प्रथम मुलगी म्हणून नेव्ही मध्ये दक्षिण कोरिया मध्ये निवड झाली आहे... त्यामुळे तनवीचे गावासह रोहा तालुका तसेच जिल्ह्यातील व विविध क्षेत्रातून तिचे कौतुक केले जात असून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे... तिने घेतलेले भरारी खरंच कौतुकास्पद आहे... याचे संपूर्ण श्रेय आपल्या आई-वडिलांना व गुरुजन वर्गाला देत आहे..

Post a Comment

Previous Post Next Post