महाराष्ट्र वेदभुमी

वारी उपक्रमांची पुस्तकाचे मान्यवरांचे हस्ते प्रकाशन


विविध नवनवीन उपक्रमांची पुस्तकात माहिती 

शिक्षक, शिक्षिका, शिक्षण प्रेमीची उपस्थिती 

आदर्श शिक्षिका, लेखिका शर्मिला महेंद्र गावंड यांच्या वारी उपक्रमांची पुस्तकाचे सर्वत्र कौतुक

उरण दि २४(विठ्ठल ममताबादे )

ज्यांच्या शैक्षणिक उपक्रमांची दखल महाराष्ट्र शासनाने घेतली. ज्यांनी शाळेत ३५० हुन वेगवेगळे नवनवीन उपक्रम शाळेत राबवून विद्यार्थ्यांना क्रियाशील केले व ज्यांना शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल ज्यांना अनेक राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले असे शिक्षण क्षेत्रातील आदर्श व्यक्तिमत्व,आदर्श शिक्षिका शर्मिला महेंद्र गावंड यांनी स्वतः शाळेत राबविलेल्या उपक्रमांवर आधारित वारी उपक्रमांची हे पुस्तक लिहिले असून हे पुस्तक सर्व शिक्षकांसाठी,नवनवीन उपक्रमांसाठी राबविणाऱ्या शिक्षकांसाठी आदर्श व प्रेरणादायी असे मार्गदर्शक पुस्तक आहे.प्रत्येकाने हे पुस्तक वाचावे व नवनवीन उपक्रम राबवून विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर घालावे... प्रत्येक शाळेत हे पुस्तक पोहोचले पाहिजे असे मत जेष्ठ साहित्यिक तथा महाराष्ट्र साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य प्राध्यापक एल बी पाटील यांनी व्यक्त केले...

आदर्श शिक्षिका शर्मिला महेंद्र गावंड यांनी लिहिलेल्या वारी उपक्रमांची या पुस्तकाचे प्रकाशन पंचरत्न इंग्लिश मिडीयम स्कुल पिरकोन, तालुका उरण येथे  करण्यात आले होते. याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेले एल बी पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले...यावेळी शिक्षक विद्यार्थी यांचे नाते कसे असावे, शिक्षकांनी कशा प्रकारे विद्यार्थ्यांना शिकवावे, नवनवीन उपक्रम कसे राबवावे, लेखणी, कविता काय असते, पुस्तक प्रकाशन करताना कोणत्या अडचणी येतात या संदर्भात उपस्थितांना आपल्या भाषणातून माहिती दिली...व सर्वांनी शर्मिला गावंड यांनी लिहिलेले 'वारी उपक्रमांची'  पुस्तक वाचावे असे आवाहन केले...

व्यासपीठावरील विविध उपस्थित  मान्यवरांनीही आपल्या मनोगतातून शर्मिला गावंड यांच्या लिखाणाचे व दर शनिवारी शाळेत राबविणाऱ्या उपक्रमांचे कौतुक करत शर्मिला गावंड व शिक्षक महेंद्र गावंड यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या...

या कार्यक्रम प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष एल बी पाटील, ज्यांच्या शुभहस्ते हा प्रकाशन सोहळा पार पाडला त्या उरण पंचायत समितीच्या शिक्षण विभागाचे प्रमुख गटशिक्षणाधिकारी प्रियांका म्हात्रे, पनवेलचे माजी गटशिक्षणाधिकारी साबळे सर, साहित्यिक ज्योत्स्ना रजपुते, माजी पंचायत समिती  उपसभापती शुभांगी ताई पाटील, माजी पंचायत समिती सदस्य रमाकांत पाटील, दहागाव माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष कृष्णा पाटील, पंचरत्न इंग्लिश मीडियम चे चेअरमन अनंत गावंड, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष सुभाष भोपी, शिवशंकर नाट्य मंडळाचे निर्माते  शेखर पाटील, नवीन शेवे  केंद्राचे माजी केंद्रप्रमुख केपा म्हात्रे, केंद्रप्रमुख शंकर म्हात्रे,जसखार केंद्र प्रमुख निर्मला घरत ,  श्री.जाधव ,  प.ध.मात्रे गुरुजी, सामाजिक कार्यकर्ते नामदेव गावंड, सरपंच श्रीमती कलावती पाटील, सामाजिक कार्यकर्ते मुकुंद गावंड,माजी सरपंच राजेंद्र गावंड, माजी सरपंच हरेंद्र गावंड,समन्वय समितीचे अध्यक्ष बळीराम पाटील,सामाजिक कार्यकर्ते संदीप गावंड,शिक्षक सेना नेते कौशिक ठाकूर,जयदास कोळी, प्रितम वर्तक, प्रशांत कोळी आदी मान्यवर उपस्थित होते...

कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी आदर्श शिक्षक म.का. म्हात्रे, रायगड भूषण किशोर पाटील, शिवव्याख्याते  धीरेंद्र ठाकूर, उपक्रमशील शिक्षक  विकास पाटील, देविदास पाटील, रमण पंडित, संगीता गावंड, श्रद्धा म्हात्रे, प्रमिला गावंड, मीनाक्षी वरसोलकर मॅडम, संपदा चव्हाण, वनिता पाटील, उषा गावंड, दिशा तांडेल, समता ठाकूर आदी शिक्षक वर्गांनी तसेच मित्र परिवारानीं विशेष मेहनत घेतली...एकंदरीत वारी उपक्रमांची या पुस्तकाचे मोठया उत्साहात, उत्तम प्रतिसादात प्रकाशन सोहळा संपन्न झाला.कार्यक्रमाचे उत्तम असे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन म.का.म्हात्रे व किशोर पाटील यांनी केले... कार्यक्रम यशस्वी केल्याबद्दल शर्मिला गावंड व महेंद्र गावंड यांनीही सर्वांचे जाहिर आभार मानले...

Post a Comment

Previous Post Next Post