माणगाव :- (नरेश पाटील) : गुरुवारी दि. 13 फेब्रुवारी, 2025 रोजी वॉर्ड क्र. 16 त्याचबरोबर 15 येथीलचा रस्त्याचा मधोमद वॉर्ड क्र. 16 येथीलचा एका ईमारत मधून सांड पाणी त्याच बरोबर वॉर्ड क्र. 15 येतीलच्या रस्त्याचा पलीकडचा सीमा भागात एका पिण्याचा पाईप लाईन फुटल्याने त्या मधून पुरवठा वेळेत तासन तास पाणी चक्क रस्त्यावर वाहत अशल्याचा बाबत चि बातमी छापले होते. विशेष बाब म्हणजे सांड पाणी आणी सुद्ध पाणी त्या भागात एकत्र रस्त्यावर संगम होऊन तसेच साठुन व वाहत असल्याचा दुर्मिळ प्रसंग चित्र समोर दिसले होते आणी गेली अनेक दिवस हीच परिस्थिती राहिल्याने दुर्गंदी, चिखल, नाक तोंड दाबून रस्तायावरून चालण्याची कसरत पादचारी यांना होत होती व येतील परिसरातील नागरिक यांच्या आरोग्याची समस्या उद्भवले होते. या समस्या बाबत आमची बातमी झळकताच सदर इमारतचे मालक यांनी दखल घेऊन 24 तासाचा आतच कामगार मार्फत सांडपाणी रस्त्यावर वाहण्यापासून रोखून व दुरुस्तीची कामे हाती घेऊन आमच्या प्रतिनिधीस व्हाट्सअप द्वारे फोटो पाठवून काम केल्याची पुष्ठी जोडले... तर दुसरीकडे पिण्याचा पाण्याचे वैयक्तिक नळ जोडणीमधून जी गळती होत असल्याचा बातमी सोबत प्रसिद्धी दिली होती तर या बाबत नगर पं. चे सिटी को-ओरदीनेटर अतुल जाधव यांनी कळविले की आपल्या बातमी चि नोंद घेऊन आमच्या कर्मचारी यांनी ती दुरुस्थी करण्यास कालच गेले होते म्हणून निदर्शनास आणुन दिले व सदर ठिकाणी दुरुस्थिची काम झाल्याची दिसून येत आहे. दरम्यानाचा काळात या बातमीची इम्पॅक्ट ने लोकशाहीचा चौथा स्तंभची ताकत काय असते याची चर्चा येतील नागरिक बोलताना प्रतिनिधीच्या कानावर पडले व कौतुक केले...
