पनवेल प्रतिनिधी : पनवेल येथील गायक दिग्दर्शक तेजस पाटील यांच्या एकविरा कला, क्रीडा, सामाजिक आणि शैक्षणिक संस्था, पनवेल व श्री. बी.के.पाटील फाऊंडेशन केळवणे यांच्या संयुक्त विद्यमाने सन्मान सोहळा आयोजित केला आहे....
रायगड, ठाणे, पालघर, नवी मुंबई आणि मुंबई या पाच सागरी जिल्ह्यातील मधील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या आगरी, कोळी, कराडी, आदिवासी समाजातील ८० व्यक्तींना भुमीकन्या सन्मान २०२५, भुमीपुत्र सन्मान २०२५ आणि EKS सन्मान २०२५ ने सन्मानित करण्यात येणार आहे,
तसेच मी महाराष्ट्राचा एक महिन्यासाठी मुख्यमंत्री झालो तर ?या आँनलाईन राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ सुद्धा होणार आहे,
सदर कार्यक्रम हा कामोठे पनवेल येथील सेक्टर १४ मधील कराडी समाज हाँलमध्ये रविवार दि. ०२ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी १०.३० वा. सपन्न होणार आहे,
सदर कार्यक्रमास विविध राजकीय, सामाजिक मान्यवरांची आणि कलाकारांची उपस्थिती असणार आहे,असे अध्यक्ष तेजस पाटील यांनी सांगितले आहे,
