उरण ( अजय शिवकर ): सावित्रीबाई फुले यांच्या १९४ व्या जयंतीनिमित्त तसेच ॲड. उमेश मधुकर ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त दि. ०३ जानेवारी रोजी संपूर्ण महाराष्ट्रातून समाजाच्या विविध क्षेत्रातून सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, कला, क्रीडा, पत्रकारिता तथा वैद्यकीय अशा क्षेत्रांत केलेल्या भरीव कार्यासाठी विशेष व्यक्तींना "कुलाबा जीवन गौरव राज्यस्तरीय पुरस्कार देण्यात येतो...
२०२५ " या यावर्षी उरण तालुक्यातील. शिवराज युवा प्रतिष्ठान संस्थेच्या माध्यमातून करत असलेले गड संवर्धन कार्य व महाराष्ट्रतील व महाराष्ट्रा बाहेरील अनेक गड किल्यांवर जाऊन स्वच्छता व संवर्धन मोहिमा राभवल्या व विविध क्षेत्रात सामाजिक कार्य व विविध शाळान मध्ये गरजू मुलांना शाळेय साहित्य वाटप करणे व आदीवासी वाड्यानमध्ये व गरजू लोकांना मदतीचा हात देणे, अनेक सामाजिक उपक्रम राबवणे ह्या सर्व कार्याची दखल घेत या पुरस्कारासाठी गणेश बळीराम तांडेल यांची निवड होऊन यांना अलिबाग सातीर्जे येथे पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले...
