महाराष्ट्र वेदभुमी

वाघाची जोडी ठरली पर्यटकांचे आकर्षण केंद्र

 


टी-१०८ नावाचा नर वाघ व टी-४५ नावाची वाघीण ठरले आकर्षण

सचिन चौरसिया प्रफतिनिधी

रामटेक:- नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ वरील चोरबाहुली वनपरीक्षेत्र सध्या पर्यटकांचे आकर्षण ठरले आहे... आयोजित पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या सफारीत दोन वाघोबांचे दर्शन घडले... साक्षात वाघोबा, वन्य प्राणी, पक्षी, मनोहारी निसर्ग परिवेश बघून हे पाहुणे रोमांचित झाले.

जल, जमीन, जंगलाशी एकरूप असणाऱ्या भारतीय संस्कृतीचे दर्शन या पर्यटन यात्रेत झाले... वन व वन्यजीव संवर्धनासंदर्भात शासनाने केलेल्या उपाययोजनांची माहिती त्यांनी घेतली... वाघांची संख्या वाढवण्यासाठी सुरू असलेल्या उपाययोजनांचीही त्यांनी दखल घेतली. चोरबाहुली गेट, जो पेंच व्याघ्र प्रकल्पाचा एक भाग आहे... येथे टी-१०८ नावाचा नर वाघ आणि टी-४५ नावाची वाघीण दररोज दिसून येत आहेत... त्यांच्या नियमित दर्शनामुळे येथे येणाऱ्या पर्यटकांच्या आनंदाला उधाण आले आहे... टी-१०८ आणि टी-४५ ही जोडी सध्या पर्यटकांच्या कॅमेऱ्याचे आकर्षण बनली आहे... पर्यटकांना सुरक्षित व उत्कृष्ट अनुभव देण्यासाठी वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी अहोरात्र कार्यरत आहेत... पर्यावरणसंवर्धनाचा संदेश देत त्यांची मेहनत अधिक प्रभावी ठरतेय...

वन्यजीवप्रेमींसाठी ही एक पर्वणीच आहे, कारण निसर्गाच्या कुशीत वाघांसोबतचा अनुभव हा आयुष्यातील अविस्मरणीय ठरतो... चोरबाहुली गेटच्या या वाढत्या लोकप्रियतेमुळे स्थानिक व्यवसाय व पर्यटन क्षेत्रालाही चालना मिळाली आहे...

पेंच व्याघ्र प्रकल्प देशभरातील पर्यटकांसाठी प्रसिद्ध आहे... येथे आढळणारे वाघ, तसेच जैवविविधतेने नटलेले जंगल पर्यटकांच्या आकर्षणाचा मुख्य भाग आहे... चोरबाहुली गेट येथील वाघांचे नियमित दर्शन ही या प्रकल्पाची विशेषता ठरत आहे...

Post a Comment

Previous Post Next Post