सन:2024-25 चा बेस्ट स्टुडन्ट अवॉर्ड, पात्र ठरली इक्रा म्हैसकर...
शहानवाज मुकादम/रोहा
रोहा:तालुक्यातील खैरेखुर्द येथे एनईएस उर्दू हाय स्कूल आणि सेमी इंग्लिश अंगणवाडी चा 16 वा वार्षिक सांस्कृतिक व पारितोषिक वितरण कार्यक्रम 2024-25 चे आयोजन करण्यात आले.. दिनांक 31 डिसें-24 व 01आणि 02 जाने-25 असा तीन दिवसीय कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला...
या कार्यक्रमाचे उद्घाटन कुराण पठणाने करण्यात आले...तसेच सन्माननीय पाहुण्यांच्या गीताने कार्यक्रमाची सुरुवात करत विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे आपल्या कलागुणांचे प्रदर्शन केले, त्यांच्या कौशल्याने आणि सर्जनशीलतेने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले...
2024-25 शैक्षणिक वर्षात गुणवत्तेसह उत्तीर्ण झालेले विद्यार्थी.
"जूनियर केजी क्वीझ "
प्रथम क्रमांक फातिमा सज्जाद रोगे,
द्वितीय क्रमांक अब्दुल्ला फरहान धनसे,
तृतीय क्रमांक मोबशिर तारीख रोगे.
"सिनियर केजी क्वीन "
प्रथम क्रमांक हसन मुजम्मिल खोत,
द्वितीय क्रमांक अमर जावेद काळोखे,
तृतीय क्रमांक अंसा मुनीम गीते.
"हायस्कूल क्वीझ "
प्रथम क्रमांक मरियम आबिद भुरे,
द्वितीय क्रमांक आयशा अल्ताफ मेमन,
तृतीय क्रमांक बूशरा महबूब धनसे.
"डिबेट बॉईज"
प्रथम क्रमांक जीशान कमाल मुकादम,
द्वितीय क्रमांक आफताब वसीम धनसे,
तृतीय क्रमांक साद नाजीम बडे.
"डिबेट गर्ल्स "
प्रथम क्रमांक आयशा अल्ताफ मेमन,
द्वितीय क्रमांक इक्रा म्हैसकर,
तृतीय क्रमांक आमीना जाकीर खोत.
"बैतबाजी शायरीची स्पर्धा"
प्रथम क्रमांक इक्रा म्हैसकर व आशिना दाखवे,
द्वितीय क्रमांक आयशा मेमन व आलिया बडे,
तृतीय क्रमांक आमीना खोत व मर्जीया धनसे.
"करियर एक्स्प्लोरेशन केजी स्टुडन्ट नर्सरी केजी"
प्रथम क्रमांक अहमद काजी,
द्वितीय क्रमांक मरियम पित्तू ,
तृतीय क्रमांक रयान धनसे.
"जूनियर केजी"
प्रथम क्रमांक अब्दुल्ला धनसे,
द्वितीय क्रमांक फातिमा रोगे,
तृतीय क्रमांक मोबसिर रोगे.
"सीनियर केजी"
प्रथम क्रमांक जोया धनसे,
द्वितीय क्रमांक अफ्रा काळोखे,
तृतीय क्रमांक फुलेहा अन्सारी.
सन:2024-25 चा बेस्ट स्टुडन्ट अवॉर्ड, हा पुरस्कार देखील समाविष्ट असुन यास पात्र ठरली इक्रा रफीक म्हैसकर .
या कार्यक्रमात बोलताना, चेअरमन एजाज धनसे, सेक्रेटरी जाकीर खोत, मेम्बर फैसल गीते आणि हायस्कूलच्या मुख्याध्यापिका सुमैया मुल्ला यांनी शिक्षण देणारी एक आदर्श संस्था म्हणून एनइएस च्या व्यवस्थापन समितीची आणि शिक्षक वर्गाची ही प्रशंसा केली... मुलांना त्यांच्या नियमित अभ्यासासोबत त्यांच्या अनोख्या शैक्षणिक दृष्टिकोनावर प्रकाश टाकत मुलांना नैतिक आणि मानसिक विकासासाठी मोलाचे मार्गदर्शन करण्यात आले...
