महाराष्ट्र वेदभुमी

दोन दुचाकिंची धडक ; दोन युवकांचा मृत्यू



सचिन चौरसिया प्रतिनिधी 

रामटेक :- वेगात असलेल्या दोन दूचाकिंची जोरदार धडक होऊन दोन युवकांचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (ता. २) पवनी ते हिवराबाजार रोडवर तुमडीटोला शिवारात येथे घडली. शुभम जयदेव उईके (वय २२) आणि क्रांतिचंद हराळ ( वय ३२) अशी मृतांची नावे आहेत..

रामटेक तालुक्यातील देवलापर पोलीस स्टेशन अंतर्गत पवनी-हिवराबाजार मार्गावरील तुमडीटोला शिवारात येथे गुरुवार (ता.२) रात्री आठ सुमारास शुभम हा पवनीकडून मूळ गाव अकोला येथे त्याची मोटर सायकल पल्सर क्र. एमएच ४० सीआर ०४१३ ने जात होता.

वरघाट निवासी संजय बावीसताले यांची हिरो होंडा मोटर सायकल क्र. एमएच ४० बी झेड ७६१८ ने तुमडीटोला फाट्यावर त्यांची वाट पाहत असलेल्या व्यक्तीला भेटायला निघाले असता अंदाजे १ किलोमीटर अंतरावर विरुद्ध दिशेने मृतक शुभम हा भरधाव वेगाने येऊन क्रांतीचंदला जोरदार धडक दिली. यामध्ये शुभम जयदेव उईके (वय २२, रा.अकोला) तर पोलीस कर्मचारी क्रांतिचंद हराळ (वय ३२, रा.देवलापार ) दोघे गंभीर जखमी झाले...

धडक इतकी जोरदार होती की दोघेही रस्त्यावर जोरात आदळले. यात गाड्यांचा मात्र अक्षरश: चुराडा झाला. दोघेही गंभीर जखमी झाले. देवलापार पोलीसा़ना माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक नारायन तुरकुंडे घटनास्थळी पोहचले...

दोघांनाही देवलापारच्या ग्रामीण रुग्णालयात प्राथमीक उपचारानंतर शुभमला नागपूरच्या मेडीकलमध्ये तर क्रांतीचंदला कामठीच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यात शुभमचा उपचारादरम्यान गुरुवारी रात्रीच मृत्यु झाला, तर पोलीस कर्मचारी क्रांतीचंद हराळ यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना कामठी वरून नागपूरला खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले, मात्र मृत्युशी झुंज देत असतांनाच दि. ४ जानेवारी २०२५ रोजी पहाटेच्या सुमारास पोलीस कॉन्स्टेबल यांनी प्राणजोत मावडली...

Post a Comment

Previous Post Next Post