महाराष्ट्र वेदभुमी

देहू आळंदी दर्शन; कोलाड स्नेह जेष्ठ नागरिक कल्याणकारी मंडळांनी वर्षा सहलीत लुटला आनंद.



कोलाड (श्याम लोखंडे ) कोलाड विभागातील ज्येष्ठ नागरिकांनी घेतला वर्षा सहलीचा आनंद देहू आळंदीचे घडले दर्शन...सालाहाबाद प्रमाणे २१ जानेवारी २०२५ रोजी स्नेह जेष्ठ नागरिक कल्याणकारी मंडळ कोलाड यांची वर्षा सहल देहू आळंदी येथे मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आली होती.. तर आयोजित वर्षासहलीचा शंभरहून अधिक जणांनी लाभ घेत मोठया उत्साहात भक्तिभावाने आनंद लुटला..

सदरच्या सहलीसाठी दोन बसेस मधून कोलाड परिसरातील किल्ला,पाले खुर्द,संभे,पाले बुद्रुक,आंबेवाडी,तिसे,वरसगाव कोलाड,गोवे,अशा गावातील जेष्ठ नागरिक सहभागी झाले होते...दोन्ही बस सकाळी ठिक ६.३० वा.कोलाड येथून संस्थापक अध्यक्ष गोरखनाथ  कुर्ले, मा.अध्यक्ष मारुती राऊत, व कार्यकारणी सदस्य यांच्या शुभहस्ते दोन्ही गाड्यांचे पूजन करून, नारळ वाढवून कोलाडहून श्री बल्लाळेश्वर गणपती बाप्पांचं दर्शन घेणेसाठी या दोन्ही बस पालीकडे रवाना झाल्या...

सहलीमध्ये सहभागी झालेले बहुसंख्येने जेष्ठ नागरिक हे वारकरी असल्यामुळे पकवाज, टाळ, मृदुंगाच्या  जय घोषात विठु रायाचे व ज्ञानोबा तुकाराम यांचे भजन करीत देहू येथे जाऊन जगद्गुरू श्री.संत तुकाराम महाराज यांचे दर्शन घेतले...त्यानंतर आळंदी येथे जाऊन श्री. संत ज्ञानेश्वर महाराज यांचे दर्शन घेतल... तसेच काही स्पाॅन्सर यांनी चहा नास्ता, लाडू, बिस्किटे, पाणी, चाॅकेलट असे दिल्यामुळे सहलीचा आनंद अधिक वाढला...

शेवटी आळंदी येथून माऊलीच्या कृपा आशिर्वादाने कोलाड येथे रात्री ११.३० वा.सुखरूप घरी परतीचा प्रवास झाला...सदर सहलीचा आयोजक व  नियोजक.श्री दगडू बामुगडे, अशोक कदम,कापसे सर,मारुती वाळंज,पांडुरंग सानप,केशव महाबले,बळीराम ठोंबरे,विठोबा गोरिवले,पांडुरंग बिरगावले,हरिचंद्र चेरफले,हरिचंद्र जाधव यांनी उत्तम प्रकारे केले...

Post a Comment

Previous Post Next Post