महाराष्ट्र वेदभुमी

केळवणे गावात नेत्ररोग शिबिराचे आयोजन

 


केळवणे-पनवेल(अजय शिवकर): मंगलवार २१ जानेवारी रोजी शांतीलाल  संघवी आय इन्स्टिट्यूट यांच्या सौजन्य ने आणि आणि श्री वेताळ वाघेश्वर स्वयं सहायता समूह व श्री गावदेवी भवानी माता मंदिर ट्रस्ट केळवणे यांच्या सहयोगाने केळवणे गावातील भवानी मंदिरात नेत्र शिबिर हा कार्यक्रम उत्तम प्रकारे पार पडला. या कार्यक्रमाचे उद्घाटन श्री गावदेवी भवानी माता मंदिर ट्रस्ट चे अध्यक्ष  जिल्हा परिषद सदस्य श्री ज्ञानेश्वर दशरथ घरत तसेच पनवेल तालुका उप तालुकाप्रमुख डॉक्टर श्री भरत घरत तसेच डॉक्टर श्री जितेंद्र जाधव सर यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला पिरकोनचे उरण तालुका उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी श्री मुकुंद बबन गावंड, माजी जिल्हा परिषद सदस्य श्री जीवन भाई  गावंड, तसेच दिघाटी मा. सरपंच अमित भाई पाटील तसेच केळवणे गावातील आशा वर्कर सौ. सीता ज्ञानेश्वर पाटील आणि त्यांची पूर्ण टीम तसेच श्री वेताल वाघेश्वर स्वयं सहायता समूह बचत गट उपाध्यक्ष श्री मनिषा नितीन म्हात्रे आणि त्यांची पूर्ण टीम. सदर कार्यक्रमात उरण तालुका उपाध्यक्ष बीजेपी मुकुंद गावंड यांनी सर्व शिबिरास आलेल्या रुग्णांना मार्गदर्शन केले आणि मार्गदर्शन करताना त्यांनी सांगितले की सदर पिरकोन गावात दीडशे लोकांच्या ऑपरेशन झाले आहेत. तरी संपूर्ण केळवणे गावात मोतीबिंदू  असलेले सर्व रुग्ण हे पूर्णपणे बरे व्हावे यासाठी शांतीलाल संघवी नेहमी कार्यरत राहील. सदर कार्यक्रमात १४९ रुग्ण आलेले होते त्यापैकी ४९ रुग्णांना मोतीबिंदू झालेला होता त्यापैकी १६ रुग्णांना एस एस आई वडाला येथे ऑपरेशन साठी नेले ...

Post a Comment

Previous Post Next Post