पंजाबराव देशमुख सेंद्रिय शेती मिशन योजने अंतर्गत
सचिन चौरसिया प्रतिनिधी
रामटेक :-नागपूर जिल्ह्यात सेंद्रिय शेतीची चळवळ विस्तारू लागली आहे. सेंद्रिय व नैसर्गिक शेतीपद्धती शेतकऱ्यांना आत्मसात होण्यासाठी कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), कृषी विभागामार्फत प्रयत्न केले जात आहे.
कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा अंतर्गत सन २०२४-२५ मध्ये पंजाबराव देशमुख सेंद्रिय शेती मिशन अंतर्गत तयार करण्यात आलेल्या त्या ५० हेक्टर च्या गटातील सदस्यांचे गाव पातळीवरील प्रथम प्रशिक्षण तालुक्यातील मौजा भंडारबोडी तसेच सालईमेटा येथे घेण्यात आले...
त्यामध्ये सुरुवातीला उपस्थित सर्व शेतकऱ्यांना सेंद्रिय प्रकल्पामध्ये आल्याबद्दल सर्वांचे स्वागत करण्यात आले नंतर त्यांना सेंद्रिय शेती विषयी त्यामध्ये रासायनिक खतामुळे होणारे विविध दुष्परिणाम, सेंद्रिय शेतीमुळे होणारे विविध फायदे त्यामध्ये वीस मुक्त अन्न, शेती करताना होणारी पैशाची बचत ,सोबत सेंद्रिय शेती करता लागणाऱ्या विविध निविष्ठा स्वतः घरी तयार करण्याविषयी माहिती दिली त्यामध्ये जीवामृत, दशपर्णी अर्क, बाय डायनामिक कंपोस्ट, सेंद्रिय मायक्रो न्यूट्रिएंट, अमृत पाणी पंचकव्य ,सेंद्रिय विडि साईड, तयार करणे सोबत बोरू, ढेंच्या, लागवड करणे, तसेच माती तपासणी, बीज प्रक्रिया जमिनीमधील कमी झालेले कार्बन, एक देशी गाय चे विविध फायदे ह्या सर्व बाबीवर उपस्थित सर्व शेतकऱ्यांना तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक श्री राजेश दोनोडे यांनी मार्गदर्शन केले सोबत प्रात्यक्षिक करून दाखविले सोबत प्रशिक्षण कार्यक्रमाला राम सागर शेतकरी उत्पादक कंपनी चे संचालक राहुल दिवटे तसेच सीईओ भाऊसाहेब सोमकुवर उपस्थित होते...
आधुनिक तंत्रज्ञान शेतीला देईल आधार
शेतीत रासायनिक खते वापरताना आरोग्यावर वाईट परिणाम पाहवयास मिळतात. गंभीर आजारांना सामोरे जावे लागते. माणसाला विषमुक्त अन्न मिळाले तर माणसाचे आरोग्य चांगले राहू शकते...त्यासाठी सेंद्रिय शेती महत्त्वाची असल्याने आत्माच्या वतीने जिल्हाभरात शेतकरी गट स्थापन करण्यात आले आहेत... त्या गटातील शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीबाबत मार्गदर्शन मिळावे यासाठी शेतकऱ्यांच्या ‘आत्मा’अंतर्गत अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात येते...
