महाराष्ट्र वेदभुमी

तेरा वर्षाच्या स्वरूप शरद पाटीलचे ॲमेझॉन वर पुस्तक प्रसिद्ध



प्रतिनिधी - सत्यप्रसाद आडाव चणेरा

   तरुणाईला मोबाईलने  विळखा घातलेल्या आजच्या काळात वाचनसंस्कृती लयास गेल्याचे दिसत असतानाच स्वरूप सारखा केवळ तेरा वर्षांचा मुलगा पुस्तके वाचत नाही, तर इतरांसाठी साहसकथा लिहून त्या ॲमेझॉनवर प्रसिद्ध करतो आणि देशविदेशात आपली शाळा नावारुपाला आणतो. विज्ञानाची मदत घेऊन वाचनसंस्कृती जपण्यासाठी धडपडणारे एक आत्मविश्वासू स्वरूप शरद पाटील या जिंदल विद्यामंदिर साळाव येथील साहसी लेखक तयार झालेला आहे... 

                इयत्ता नववी मध्ये शिकणाऱ्या स्वरूप शरद पाटील या विद्यार्थ्याने स्वतःच साहसी कथा लिहून त्या ॲमेझॉन वरून पाठवल्या. ॲमेझॉन वर पाठवल्यानंतर त्यांच्याकडून या साहसी कथा चे पुस्तक तयार करण्यात आले. पुस्तकाचे लोकार्पण करण्याचे हक्क ॲमेझॉन वर घेण्यात आले. यावेळी या विद्यार्थ्याकडून खाते नंबरची मागणी करण्यात आली. त्यावेळी पालकांना आपल्या मुलांनी लिहिलेले पुस्तकाची जाणीव झाली. पालकांचे सहकार्य न घेता, स्वतः इंग्रजी भाषेत पुस्तक लिहून, ते टाईप करून, ॲमेझॉन वर पाठवणे, त्यांच्याशी बोलणे, पुस्तक तयार करणे, इत्यादी गोष्टी स्वरूपने एकट्याने केल्या. वय वर्ष आवघे १३ असणाऱ्या या मुलाचे हे कार्य खरोखरच कौतुकास्पद आहे...   

                याची दखल घेऊन मुरुड तालुका विज्ञान प्रदर्शनात रायगड जिल्हा शिक्षणाधिकारी रायगड जिल्हा परिषद गुरव मॅडम , तालुका गटशिक्षणाधिकारी सुनील गवळी तसेच जिंदल विद्या मंदिर प्राचार्य ठाकूर व इतर मान्यवरांनी कु.स्वरुप पाटील व त्याचे आईवडील शरद पाटील व सीमा पाटील यांचा सत्कार केला. असे विद्यार्थी जिंदल विद्या मंदिरात घडत आहेत, तसेच मुरुड तालुक्यामध्ये असे विद्यार्थी आहेत याचा सार्थ अभिमान असल्याचे गटशिक्षणाधिकारी गवळी साहेबांनी सांगितले...

Post a Comment

Previous Post Next Post