महाराष्ट्र वेदभुमी

केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या महत्त्वाकांक्षी सुवी बर्ड पार्कचे भूमिपूजन


सचिन चौरसिया प्रतिनिधी

रामटेक :- रामधाम येथील ' सुवी बर्ड पार्क ' चे  दि.२१ डिसेंबर ला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे हस्ते थाटात भुमीपुजन झाले. यावेळी पर्यटक मित्र चंद्रपाल चौकसे, मुलगा गौरव चौकसे हे प्रामुख्याने उपस्थित होते. मनसर येथील प्रख्यात रामधाम येथे संस्थापक चंद्रपाल चौकसे हे आपल्या कल्पकतेतुन पर्यटकांच्या मनोरंजनाच्या हेतुने विविध बाबी उभारत असतात. त्यांनी रामधाम येथे विविध देवी देवतांचे दर्शन, ओम, मुलांच्या खेळण्याचे साहित्य तथा वॉटर पार्क ची व्यवस्था केलेली आहे. त्यालाच जोड म्हणून सुवी बर्ड पार्क चे सुद्धा दि. २१ डिसेंबर ला भुमीपुजन करण्यात आले... 

तसेच भारतातील पहिल्या बायो-बिटूमेन नविन टेक्नॉलॉजी निर्मित नागपूर जबलपूर महामार्गावरील मनसर ते आमडी गावापर्यंत २ किलोमीटर डांबर रस्त्याचे उद्घाटन केंद्रीय मंत्री, रस्ते वाहतुक व महामार्ग, भारत सरकार यांच्या हस्ते करण्यात आले...

शेतातील तणस, कापसाचे झाड, खराब झालेल्या टायराचा बारीक चुरा, बांबु वनस्पती इत्यादी पासुन नविन टेक्नॉलॉजीने डांबर निर्मित केल्या जात असुन त्याचे प्रात्यक्षीक मनसर ते आमडी महामार्गावर २ किलोमीटर डांबर रोड तयार करण्यात आला असून लागणारा खर्च ही कमी असेल व सध्याच्या डांबरापेक्षा उच्च दर्जाचे डांबर  बायो वेस्ट पासुन तयार करण्यात येणार असल्याचे केंद्रिय मंत्री नितिन गडकरी यांनी पत्रकारांना संबोधीत करतांना माहीती दिली...

यावेळी माजी आमदार मल्लीकार्जुन रेड्डी, पंचायत समिती सदस्य कलाताई ठाकरे, माजी नगराध्यक्ष दिलीप देशमुख, माजी न.प. उपाध्यक्ष आलोक मानकर, पप्पु यादव, उमेश पटले यांचेसह नागरीक उपस्थित होते...

Post a Comment

Previous Post Next Post