कोलाड (श्याम लोखंडे ) : रोहा तालुक्यातील गावदेवी बाहे आयोजित क्रिकेट सामन्यात धाक्सूद चिल्हे संघ ठरला अंतिम विजेता ठरला आहे अंतिम सामना धाकसुद चिल्हे विरुद्ध धाक्सूद क्रीडा मंडळ चिल्हे संघ यांच्यात झालेल्या अंतिम अटीतटीच्या सामन्यात अखेर धाक्सूद चिल्हे संघाने बाजी मारत प्रथम क्रमांक पटकवला तर धाक्सूद क्रीडा मंडळ चिल्हे संघाला दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले...तसेच स्पर्धेतील तृतीय क्रमांक रॉयल किंग शिरवली हा संघ मानकरी ठरला... उत्कृष्ट सामनावीर चिल्हे संघाचा प्रज्योत लोखंडे स्पर्धेतील उकृष्ट गोलंदाज शिरवली संघाचा साहिल पोटफोडे, तर उत्कृष्ट फलंदाज शिरवली संघाचा संघाचा राहुल पोटफोडे यांना प्रमुख पाहुण्याच्या शुभहस्ते गौरविण्यात आले..
खांब विभागीय क्रिकेट असोसिएशन च्या मान्यतेने रविवारी २२ डिसेंबर रोजी गावदेवी बाहे यांच्या वतीने आयोजित केलेल्या स्पर्धा निसर्गरम्य महिसदरा पत्राच्या किनाऱ्यावरील प्रांगणात भव्य दिव्य असे क्रिकेट सामन्याचे उद्घाटन उदघाटन प्रगतशील शेतकरी लिंबाजी थिटे, सुभाष माठल, संतोष थिटे, प्रवीण थिटे,यांच्या शुभहस्ते करण्यात आले. उत्स्फुर्तपणे प्रतिसाद लाभलेल्या सदरच्या गावदेवी बाहे मित्र मंडळाने आयोजित केलेल्या स्पर्धेला व क्रिकेट खेळाडूंना शुभेच्छा व प्रोत्साहन देण्यासाठी पत्रकार डॉ.श्याम भाऊ लोखंडे, नंदकुमार मरवडे सर, क्रीडाप्रेमी नितीन भोईर, रविंद्र थिटे, तेजस बामुगडे,आदी मान्यवरांनी सदिच्छा दिल्या...
तर सदरच्या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी कै. जिजाबाई बाळाराम साळसकर यांच्या स्मरणार्थ रोशन मोरे, शिवाजी साळसकर यांनी चषक दिले, प्रत्येक सामण्यासाठी सामनावीर चषक नितीन भोईर यांनी दिलेले, उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, अष्टपैलू खेळाडू चषक रुपेश बामुगडे यांनी दिले तर स्पर्धेत सर्व सन्मानचिन्ह, रमाकांत मालुसरे यांनी दिले...
मोठया उत्साही वातावरणात खांब विभागीय क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने गावदेवी बाहे यांच्या वतीने आयोजित केलेल्या 2024/25 या वर्षातील प्रथम स्पर्धा बाहे येथे रंगदार पार पडत रसिक प्रेक्षकांनी भरभरून आनंद लुटला तर संपन्न झालेल्या स्पर्धेचे बक्षीस वितरण समारंभ तसेच खेळाडूंचा सत्कार नरेंद्र माळी सर, रोहा तालुका ओबीसी संघर्ष समन्वय समितीचे अध्यक्ष अनंत थिटे, दयाराम भोईर, मंगेश चव्हाण, रुपेश बामुगडे, मंगेश ठाकूर यांच्या शुभहस्ते करण्यात आले... तसेच कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाचे पदाधिकारी युवक व सर्व सदस्य यांनी अथक परिश्रम घेतले...

