महाराष्ट्र वेदभुमी

महीलांची सुरक्षितता व यूजीसी नियम २०१५ विषयक कार्यशाळा


सचिन चौरसिया प्रतिनिधी

रामटेक: कविकुलगुरु इंस्टिटयूट ऑफ टेक्नालॉजी अँण्ड सायंस (किट्स) रामटेक मध्ये महिला सुरक्षा सप्ताहच्या निमित्याने   अंतर्गत तक्रार निवारण समिती (आयसीसी) तर्फे छत्रपती शिवाजी सेमिनार हाल मध्ये महीलांची सुरक्षितता व यूजीसी नियम २०१५ विषयक मार्गदर्शन कार्यक्रम ०५  डिसेंबरला आयोजन करण्यात आले...

कार्यक्रमाचे उद्‌घाटन संस्कृत विद्यापीठाच्या आयसीसी व महिला सेलच्या अध्यक्ष  डॉ. राजश्री मेश्राम यांनी केले. अध्यक्षता प्राचार्य डॉ. अविनाश श्रीखंडे यांनी केली...यावेळी प्रामुख्याने आयसीसी प्रमुख प्रा. वैशाली पांडे, आयक्युएसी  डीन व  मेकैनिकल विभाग प्रमुख डॉ.यशवंत जीभकाटे सहित विभाग प्रमुख, डीन, प्राध्यापक व विद्यार्थीनी मोठ्या संख्येत उपस्थित होते....

डॉ. राजश्री मेश्राम यांनी प्रेजेंटेशनच्या माध्यमातून उच्च शिक्षण संस्था मध्ये महीलांची सुरक्षितता व यूजीसी नियम २०१५  विषयक मार्गदर्शन  केले... त्या म्हणाल्या की कोणत्याही संस्थामध्ये महिला व पुरुष मधे भेदभाव न करता महिलांना समान संधी आहे...

महिलांशी कोणी दुराचाराच्या भावनेतून काम करत असेल तर त्यानी संस्था अंतर्गत तक्रार निवारण समिती कड़े तक्रार करावी... प्राचार्य डॉ. अविनाश श्रीखंडे म्हणाले की  महिला सुरक्ष्या सप्ताहच्या माध्यमातुन आयोजित कार्यक्रमामुळे महिला मधे जागरूकता वाढेल... किट्स चे संस्था सचिव वी. श्रीनिवासराव तसेच प्राचार्य डॉ. अविनाश श्रीखंडे यांचे मार्गदर्शन लाभले.... तसेच डॉ. के. गजानन शर्मा, प्रा. श्रीनिवास रायडू, संगीता भूरे, रूपेश कठाने सहित इतरांनी कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता प्रयत्न केले... प्रस्तावना प्रा. वैशाली पांडे, संचालन, डॉ. स्नेहल मालोदे व आभार आयटी  विभाग प्रमुख प्रा. सरोज शंभरकर यानी केले...

Post a Comment

Previous Post Next Post