प्रदुषण महामंडळ नुकसान भरपाई देईल का?धाटाव पंचक्रोशीतील शेतक-याचा सवाल!
अनंता म्हसकर (धाटाव रोहा):.रोहा तालुक्यातील धाटाव पंचक्रोशीतील चौदा गावातील शेतीला नेहमीच प्रदुषण करणारे बेजबाबदार कारखानदार यांनी या पंचक्रोशीतील चौदा गावाच्या नुकसान भरपाईकडे दुर्लक्ष केले... तसेच या पंचक्रोशीत स्थानिक राजकीय पुढारी यांनी सुध्दा स्वतःचा स्वार्थ साधला असून धाटाव पंचक्रोशीतील शेतकरी वर्गाला देशोधडीला लावले ल... येथील नागरिकांचे आरोग्यही धोक्यात असुन भूमीपूत्राला काही फायदा झाला नाही तसेच प्रदुषण नियंत्रण मंडळ रसद घेतली की गप्प या ठिकाणी शेतकरी वर्गानी चळचळ उभारण्याची गरज झाली असून प्रदुषण नियंत्रण मंडळ धारेवर धरण्याची मागणी जोर आता धरत आहे...
ढगाळ वातावरणामुळे कडधान्य पिकाना धोका
रोहा तालुक्यात गेल्या आठवडयाभरापासून ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने याचा फटका शेतक-याच्या कडधान्य पिकाला बसत असून शेतकरीवर्ग चिंताग्रस्त झाला आहे तर याच ढगाळ वातावरणामुळे हुडहुडी भरणारी थंडी गायब झाली असल्याचे रोहा तालुक्यात चित्र दिसून येत आहे....राज्यात नव्या महायुती सरकारने हिवाळी अधिवेशनात रोहा तालुक्यातील होणा-या प्रदुषण नियंत्रण मंडळ यांच्यावर कारवाई करावी आणि शेतकरीवर्गाला तातडीने नुकसान भरपाई जाहिर करुन पंचनामा करण्याचे आदेश करावे,
धाटाव एमआयडीसीतील पंचक्रोशीतील येणा-या चौदा गावाचा विकास काम असताना हि गावे कायम स्वरुपी प्रदुषणाच्या विळख्यात असताना या पंचक्रोशीतील गावाना प्रदुषण महामंडळाकडून कोळी समाजाच्या धर्तीवर नुकसान देण्यात येईल का असा सवाल शेतकरीवर्ग केला जात आहे,


