सामाजिक दायित्व उपक्रमा अंतर्गत महाविद्यालयातील गरजू विद्यार्थ्यांना पुस्तके वाटप..
शहानवाज मुकादम रोहा (जाहीद फकजी)
मुरुड: शहरात विज्ञान शाखेतील दर्जेदार शिक्षण देणाऱ्या अंजुमन इस्लाम जंजिरा डिग्री कॉलेज ऑफ सायन्स या महाविद्यालयातील गरजू विद्यार्थ्यांना जमातुल मुस्लिमीन मोहल्ला बाजार, मुरुड-जंजिरा तर्फे पुस्तक वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले...
सर्वप्रथम या कार्यक्रमाची सुरुवात ईश्वराच्या नावाने व कुराण पठण करून करण्यात आली...जमातुल मुस्लिमीन मोहल्ला बाजार यांच्याकडून असे उपक्रम नेहमीच राबविण्यात येत असते...
सामाजिक सलोखा राखता यावा तसेच उच्च शिक्षण घेणाऱ्या गरजू विद्यार्थ्यांना पुस्तकांअभावी अडथळा निर्माण होऊ नये व त्यांना पुस्तकांची कमी पडू नये या निमित्ताने अंजुमन इस्लाम डिग्री कॉलेज ऑफ सायन्स या महाविद्यालयातील गरजू विद्यार्थ्यांना जमातूल मुस्लिमीन मोहल्ला बाजार यांच्याकडून आज जवळपास पंधरा हजार किमतीचे ८० पुस्तके वाटप करण्यात आली...
पुस्तक वाटप या निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असुन या कार्यक्रमाचे आयोजन डिग्री कॉलेजच्या एका भव्य हॉलमध्ये डिग्री कॉलेजचे प्राचार्य डॉ, साजिद शेख यांनी केले होते...
या कार्यक्रमामध्ये डिग्री कॉलेजचे विद्यार्थी मोठ्यासंख्येने सहभागी झाले आसुन शिक्षक वर्ग, कर्मचारी वर्ग व जमातूल मुस्लिमीन चे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, सहसचिव व सदस्य उपस्थित होते...
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कॉलेजचे प्राचार्य डॉ. साजिद शेख यांनी केले...तसेच जमातूल मुस्लिमीन मोहल्ला बाजार चे अध्यक्ष व उपाध्यक्ष यांनी विद्यार्थाना मार्गदर्शन करताना आपले मनोगत व्यक्त केले...
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. निदा गोरमे यांनी उत्कृष्ट शैलीत केले तसेच उपस्थित सर्वांचे आभार मानून या कार्यक्रमाला अल्पविराम दिले...
