महाराष्ट्र वेदभुमी

वारकरी शिक्षण संस्थेकरिता भूमीदान समारंभ सोहळा


सचिन चौरसिया प्रतिनिधी

रामटेक : वारकरी शिक्षण संस्था आळंदी (देहू) येथील वारकरी शिक्षण संस्थेची उपशाखा रामटेक मध्ये सुरु करण्या करिता भूमीदान समारंभ ६ डिसेंबरला पावन भूमि सोनेघाट येथे  सकाळी आयोजित केला आहे.... वत्सलाबाई भगवान मेहरकुळे, रेखा देवचंद हटवार आणि देवचंद टिकाराम हटवार हे  भूमी दाते आहेत... ते ४ एकर शेती दान देणार आहे...

स्वानंद सुख निवासी सद्गुरु जोग महाराज संस्थापित वारकरी शिक्षण संस्थेची उपशाखा प्रभू रामचंद्राच्या पवित्र पावन भूमी सोनेघाट, रामटेक या ठिकाणी स्थापन करण्याच्या हेतूने संस्थेकरीता चार एकर भूमीदान समारंभ सोहळा शांतीब्रह्मश्री ह. भ.प.गु. मारुतीबाबा कुरेकर, ह.भ.प. संदीपान महाराज शिंदे अध्यक्ष वा. शि. संस्था, ह.भ.प. रामराव महाराज ढोक विश्वस्त वा.शि. संस्था यांचे शुभहस्ते आणि प्रमोद महाराज ठाकरे,तुकाराम महाराज मुलीक व सद्गुरु जोग महाराज संस्थापित वारकरी शिक्षण संस्था आळंदी (देहू) आजी माजी विद्यार्थी वृंद यांच्या प्रमुख उपस्थितीत ६ डिसेंबर रोज शुक्रवार ला आयोजित केला आहे....

 कार्यक्रम सकाळी ७ वाजता हनुमंतरायाच्या महाभिषेक पासून सुरू होईल... वै. तपोनिधी सिताराम महाराज व स. जोग महाराज यांच्या प्रतीमेसह मंदिरापासून कार्यक्रम स्थळी दिंडी काढण्यात येईल... तिथे या प्रतिमांच पूजन केल्या जाईल....सकाळी १० वाजता ह.भ.प. रामायणाचार्य रामराव महाराज ढोक (नागपूरकर) यांचे कीर्तन होईल... सकाळी ११ वाजता भूमिदान समारंभ  व महाप्रसाद वितरण केल्या जाईल... या सोहळ्याचे आयोजन सोनेघाटचे ग्रामस्थ,रामटेक परिसरातील भाविक मंडळी आणि वारकरी संप्रदाय करीत आहे... विशेष म्हणजे आळंदी, पंढरपूर नंतर भारतातील रामटेक हे तिसरे स्थान ठरणार आहे...

Post a Comment

Previous Post Next Post