बामणसुरे येथील दुःखद घटना,परिसरात हळहळ व्यक्त
सोगाव - अब्दुल सोगावकर : अलिबाग तालुक्यातील चोंढी बामणसुरे येथे सोमवार दि. २३ डिसेंबर २०२४ रोजी संध्याकाळच्या वेळी दुःखद घटना घडली, प्रशांत विचारे यांचा नऊ वर्षीय मुलगा मिहीर विचारे हा सायकल वरून पडून जखमी झाला होता, त्याला अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते, मात्र उपचाराला प्रतिसाद न मिळाल्यामुळे त्याचे निधन झाले आहे, त्याच्यावर रात्री उशिरा बामणसुरे येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले, अंत्यसंस्कारावेळी विचारे यांचे नातेवाईक, मित्रपरिवार, राजकीय व सामाजिक क्षेत्रातील तसेच पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते, मुलाच्या अकस्मात मृत्यूबाबत पंचक्रोशीत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे...
याबाबत सविस्तर वृत्त असे की,बामणसुरे येथील प्रशांत विचारे यांचा एकुलता एक मुलगा कु. मिहीर प्रशांत विचारे(वय ९) हा बामणसुरे गावातच सायकल चालवत असताना अचानक तोल जाऊन पडला, काही वेळाने तो आपल्या घरी गेल्यावर अत्यवस्थ झाला, तेव्हा घरातील सदस्यांनी त्याला जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले, तेव्हा डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी मुलाला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यास सांगितले... सदर मुलाला जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आल्यानंतर काही वेळाने उपचारादरम्यान प्रतिसाद न मिळाल्याने डॉक्टरांनी शेवटी मृत घोषित केले... त्याच्यावर बामणसुरे स्मशानभूमीत रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या पश्चात आई, बाबा व इतर परिवार आहे... कोणत्याही प्रकारचा दुखवटा स्वीकारला जाणार नाही, असे त्यांच्या कुटुंबातील निकटवर्तीयांनी सांगितले आहे... याबाबत अधिक तपास पोलीस करत आहेत...