तब्बल ४२ वर्षानी लाभले रामटेक नगरीला मंत्रीपद
सचिन चौरसिया प्रतिनिधी
रामटेक:- राज्यमंत्री पदाची शपत घेतल्यानंतर पहिल्यांदाच तालुक्यात येणारे मंत्री ना. आशिष जयस्वाल यांचे अतिशय जल्लोषात स्वागत करण्यात आले... रामटेक येथील बसस्थानक येथे डिजे , प्रचंड फटाक्याची आतिषबाजी व घोषणाबाजी करुण त्याचे स्वागत झाले... यावेळी सत्काराला उत्तर देताना जयस्वाल यांनी मतदारांप्रति कृतज्ञता व्यक्त केली... राञंदिवस एक करेल आणि सगळ्यांना जे जे हवे ते देण्याचा प्रयत्न करेल असे ते म्हणाले...
ना.आशिष जयस्वाल हे मंञी पदाची शपथ घेतल्यानंर पहिल्यांदाच रामटेक शहरात येणार असल्याने मंगळवार दि.१७ रोजी रामटेकचे बसस्थानक ते गांधी चौक हा रस्ता स्वागत कमानी व फुलांनी सजविण्यात आला होता... या रस्त्याच्या दुतर्फा स्वागताचे होर्डिंग लावण्यात आले होते... सबंध रस्ता भगव्या पताकांनी उठून दिसत होता... बसस्थानक ते गांधी चौक अशा रॅलीचे देखील आयोजन करण्यात आले होते... फेटे बांधून रॅलीत सहभागी झालेल्या महिला सर्वांचे लक्ष वेधून घेत होत्या... डीजे, बँडच्या गजरात रॅली काढण्यात आली... कन्हान, टेकाडी, पारशिवनी, मनसर येथे देखील ना.जयस्वाल यांचे स्वागत करण्यात आले. आल्याने रामटेकला पोहोचायला जयस्वाल यांना राञीचे ९.३० वाजले... गांधी चौक या सत्कार स्थळी पोहोचताच जय शिवाजी जय भवानी, कोन आला रे कोण आल्याच्या घोषणांनी आसमंत दणाणून गेला... फटाक्यांची नेञदिपक आतषबाजी करण्यात आली... आपल्या लाडक्या नेत्याच्या स्वागतासाठी रामटेककरांनी मंचावर उत्स्फुर्तपणे गर्दी केली...यावेळी बोलताना ना.जयस्वाल भारावून गेले...काही वेळा त्यांचा स्वर देखील कातर झाला... ते म्हणाले तुमच्या प्रेमाचा मी उतराई होवेच शकत नाही त्यामुळे मी तुमच्यापुढे नतमस्तक आहो. यावेळी त्यांनी रोजगार निर्मितीसाठी काम करणार असल्याचे सांगीतले... या सत्कार समारंभाच्या आयोजनात शिवसेनेचे शहर प्रमुख राजेश किंमतकर,माजी नगरसेवक सुमित कोठारी यांनी विशेष परिश्रम घेतले...मंचावर शिवसेना तालुका प्रमुख विवेक तुरक, शिवसेना शहर प्रमुख राजेश किंमतकर, जि.प सदस्य संजय झाडे, माजी जि.प.सदस्य नरेश धोपटे, माजी नगराध्यक्ष नलिनी चौधरी, माजी नगरसेवक बिकेंद्र महाजन, माजी नगरसेविका सुरेखा माकडे, जि.प सदस्य नंदा लोहबरे,भाजपचे जिल्ह्याचे पदाधिकारी संजय मुलमुले, राहूल किरपान,भाजप चे पदाधिकारी, सुमित कोठारी, रश्मी काठीकर व शिवसेना पदाधिकिरी कार्यकर्ता आदींचा समावेश होता...
