महाराष्ट्र वेदभुमी

रोहा तालुक्यातील तळवलीतर्फे अष्टमी ग्रामपंचायत उपसरपंचपदी अनघा खांडेकर

कोलाड (श्याम लोखंडे) रोहा तालुक्यातील तळवली तर्फे अष्टमी ग्राम पंचायतीच्या उपसरपंच पदी चिल्हे गावच्या शेकापच्या सौ. अनघा अभिजित खांडेकर यांची सर्वांनुमते बिनविरोध निवड करण्यात आली आहे... ही निवड प्रक्रिया ग्रामपंचायतीच्या सभागृहात प्रशासनाच्या नियमांचे पालन करून मोठ्या उत्साहात पार पडत सौ खांडेकर यांची उपसरपंच म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली आहे...

या ग्राम पंचायतीवर राष्ट्रवादी, शेकाप, भाजप, आघाडी युतीच्या माध्यमातुन ग्राम विकास आघाडीचा दारुण पराभव करत झेंडा फडकवला होता...तर थेट सरपंच निवडणुकित विरोधकांचा पराभव करत एक हाती सत्ता मिळविण्यात ही आघाडी यशस्वी ठरली त्यामुळे ठरलेल्या ठराविक कालावधीनंतर आघाडी धर्म पाळत राष्ट्रवादीचे उपसरपंच संदीप महाडिक यांचा कार्यकाळ संपल्यानंतर या ग्रामपंचायतीवर सर्व कार्यर्कत्यांनी निवडणुकीपूर्वी ठरवल्या प्रमाणे सौ खांडेकर यांना संधी देत यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली...

यावेळी प्रमुख उपस्थितीत विद्यमान सरपंच रविंद्र मरवडे, उपसरपंच संदीप महाडिक, सदस्य दयाराम मरवडे, सौ.निलम वाळंज, सौ.सुकेशनी महाडिक, मांगुळकर, ग्राम सेवक सौ पिंपलकर, कर्मचारी सुभाष बामणे, माजी सरपंच वसंत मरवडे,राम मरवडे, माजी उपसपंच गजनान बामणे, नेते मारूती खांडेकर, राम महाडिक, खेळू मरवडे, नामदेव मरवडे, अलंकार खांडेकर, सह राष्ट्रवादी, शेकाप भाजप युतीचे कार्यकर्ते महिला चिल्हे आणि तळवली  ग्रामस्थ उपस्थित होते...

यावेळी नवनिर्वाचित उपसरपंच सौ अनघा खांडेकर   यांना विविध राजकीय मान्यवरांनी, तसेच उपस्थित ग्रामस्थांनी, ग्रामपंचायतीमधील त्यांच्या कार्यकर्त्यांनी शुभेच्छा दिल्या...

त्यांच्या या निवडीनंतर जेष्ठ नेते वसंत मरवडे, राम मरवडे, सरपंच रविंद्र मरवडे यांनी सांगितले की रायगडाचे खासदार सुनील तटकरे, मंत्री अदिती तटकरे, माजी आमदार तथा युवा नेते अनिकेतभाई तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली गावचा सर्वांगीण विकासाला अधिक चालना मिळत आहे तर यासाठी आपण नेहमीच एकोप्याने काम करत आलो असल्याने हद्दीतील विकासाला सदैव यापुढेही देखील विविध विकास कामे करण्यासाठी भविष्यातही ग्रामविकासाचा रथ पुढे असाच चालू ठेवू. महिलांच्या अडचणी सोडवण्यास प्रथम प्राधान्य देऊ... सद्या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावासह वाड्या वस्त्यांवर विविध विकास कामे झाली असून काही ठिकाणी कामे सुरूही आहेत यावर अधिक भर देत सरपंच उपसरपंच सह सदस्य यांनी लक्ष केंद्रित करून विकासाला प्राधान्य देणे गरजेचे आहे...

Post a Comment

Previous Post Next Post