अचल किल्ला स्पर्धा मध्ये अद्विक कोहळेच्या जंजीरा प्रथम
सचिन चौरसिया प्रतिनिधी
रामटेक : आपण इतिहास विसरलो तर इतिहासाची पूनरारुत्ती होते अस म्हणतात... छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रभुत्वाने स्वराज्याची स्थापना होण्यापासून तर ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून स्वतंत्र होण्यापर्यंत ज्या प्रेरणेने झपाटले होते त्याचा महत्त्वाचा भाग हा छत्रपतींनी बांधलेल्या दुर्गात आहे... हेच कारण घेऊन सृष्टी सौंदर्य बहुउद्देशिय संस्थेने वैकुंठ चतुर्दशीचे निमित्त साधून किल्ले स्पर्धेचे आयोजन केले...
सृष्टी सौदर्य बहुउद्देशीय संस्था रामटेक द्वारा १५ नोव्हेंबरला किल्ले स्पर्धाचे आयोजन केले होते... १२ स्पर्धकांनी भाग घेतला होता... स्पर्धा मध्ये चल व अचल असे दोन भाग केले होते... अचलमध्ये घरी तयार केलेले मातीचे किल्ले व चल मध्ये प्रदर्शनीत ठेवलेले किल्ले होते... किल्ले स्पर्धा विषयी बोलताना सृष्टी सौंदर्य परिवारचे ऋषिकेश किंमतकर म्हणाले की रामटेक परिसर निसर्ग व विविधतेने नटलेला आहे... छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाच स्मरण, त्यांचे आदर्श जुन्या-नवीन पिढीला पुन्हा पुन्हा कळावे ज्यामुळे राष्ट्रबांधणी कार्यात प्रेरणा मिळेल म्हणून दरवर्षी किल्ला स्पर्धाचे आयोजन केले जाते... अचल मातीच्या किल्हा स्पर्धा मधे अदविक कोहळेच्या जंजीरा प्रथम, सर्वज्ञ येरपुडे व रुगवेद बारोकर द्वितीय.., राजन्या किंमतकर व मिराई पब्लीक स्कुल तृतीय क्रमांकवर राहिल्या...
चल किल्ला स्पर्धा मध्ये तृनिका धमगाये व प्रथमेश बांते प्रथम, हिमांसी काठोके व रुद्र वाडीकर द्वितीय, हर्ष कांबळे व सिदेश वाघधरे तृतीय, तारिया शेख व आदित्य बरबटे यांना प्रोत्साहन पुरस्कार मिळाले...
किल्ले स्पर्धा यशस्वी करीता भूषण देशमुख, वेदप्रकाश मोकदम, नंदेश शेळके, रविंद्र नारनवरे, सारंग पंडे, राजेश बाकडे, राजेश किमतकर, लक्ष्मीकांत तीबुडे सहित आदिनी पर्यत्न केले...
