महाराष्ट्र वेदभुमी

जिएसटी मधून पैसे उखळले व त्यातला तुकडा फक्त लाडक्या बहिणींना

५० वर्षे दोनच घराण्यांनी या मतदार संघांचे नेतृत्व केले तरी या मतदार संघाचा विकास होऊ शकला नाही ही खेदाची गोष्ट:-प्रसाद दादा भोईर

सर्वहरा जन आंदोलन व भारत जोडो अभियान यांचा पाठींबा.

कोलाड (श्याम लोखंडे )१९१ पेण मतदार संघातील मुख्य प्रश्न आहे रोजगार, आपल्या मतदार संघात रोजगार विषयी तरुणांमध्ये प्रचंड नाराजी दिसून येत आहे.मुंबई जवळ असल्यामुळे येथील तरुणांना रोजगार उपलब्ध होऊ शकतो. यासाठी येथील आमदारांनी मोठं मोठे प्रकल्प आणायला पाहिजे होते.येथील आमदारांनी स्वतःच्या व मुलांच्या भविष्या व्यतिरिक्त कोणतेही काम केले नाही..    

आपल्या कोकणात धो धो पाऊस पडतो परंतु तरीही आपल्या मतदार संघात तसेच खाडेपट्टयात पाच महिने तीव्र पाणी टंचाई असते धो धो पडणारे पाणी हे समुद्राला जाते परंतु तीन तीन धरणे उशाशी असुन ही पाणी मिळत नाही गेली ५० वर्षे दोनच घराण्यांनी या मतदार संघाचे नेतृत्व केले तरी या मतदार संघाचा विकास होऊ शकला नाही ही खेदाची गोष्ट आहे असे मत आंबेवाडी येथील प्रचार सभेत प्रसाददादा भोईर यांनी व्यक्त केले..

तसेच मुंबई गोवा हायवे महामार्गाचे काम हे गेली चौदा ते पंधरा दिवसापासून सुरु दरवर्षी डेडलाईन दिली जाते. परंतु महामार्गाचे काम पूर्ण होत नाही यामुळे वाहतुकीचा खोलंबा होतो तर कोणाचा नाहक बळी जातो ही लोकप्रतिनिधीची जबाबदारी असते परंतु या महामार्गाचे काम पूर्ण होऊ शकले नाही..

तसेच माजी केंद्रीय मंत्री अनंत गिते यांनी आपले मनोगत करतांना सांगितले की आपल्या रायगड जिल्ह्याचे पूर्वी नाव कुलाबा होते हे आताच्या पिढीला माहिती नसेल परंतु  बॅरिस्टर ऐ आर अंतुले यांनी ते बदलून रायगड जिल्हा ठेवले कारण आपल्या एकमेव महाराष्ट्र राज्याला इतिहास आहे बाकी राज्य भूगोल आहेत.यामुळे आपल्याला इतिहास घडवून प्रसाद दादा भोईर यांना विजय करून विधानसभेसाठी पाठवायचे आहे.कारण प्रसाद दादा भोईर हे उच्च शिक्षित असुन त्यांना प्रशासनाचे चांगले ज्ञान आहे..

आंबेवाडी बाजारपेठेत विधानसभा निवडणुकीचे महाविकास आघाडीचे उमेदवार प्रसाद दादा भोईर यांची प्रचार सभा आयोजित करण्यात आली.यावेळी व्यासपीठावर माजी केंद्रीय मंत्री अनंत गिते, विधानसभा उमेदवार प्रसाद दादा भोईर, जिल्हा प्रमुख किशोरभाई जैन, सुरेंद्र म्हात्रे,सुधीर ढाणे,काँग्रेस नेत्या नंदा म्हात्रे,जनहराच्या उल्का ताई महाजन,चेतना लोखंडे, चंद्रकांत लोखंडे, सुनिल महाडिक,कुलदीप सुतार व उबाठा पक्षाचे सर्व कार्यकर्ते,असंख्य आदिवासी बांधव, महिला वर्ग उपस्थित होते...

 यावेळी विधानसभा उमेदवार प्रसाद दादा भोईर यांना सर्वहरा जन आंदोलन व भारत जोडो अभियान यांनी पाठींबा दिल्याचे पत्र देण्यात आले.यावेळी सर्व हरा जन आंदोलनच्या नेत्या उल्का महाजन यांनी सांगितले की कोरोना काळात रांगेत उभे राहुन नोटा बदलाव्या लागल्या  मजुरांची वाताहत झाली.बदलापूर मध्ये साडे तीन वर्षाच्या मुलीवर अत्याचार झाले याचे उत्तर द्या जिएसटी मधून पैसे उखळले व त्यातला तुकडा फक्त लाडक्या बहिणींना फेकला...

काँग्रेसच्या नेत्या नंदा म्हात्रे यांनी आपले मत व्यक्त करतांना सांगितले ज्यांना पक्षानी भरपूर काय दिले परंतु पक्षाला उतरती कला लागल्या नंतर ते भाजप मध्ये गेले परंतु त्यांना खाडेपाट विभागातील ४५ गावाचा पाण्याचा प्रश्न सोडविता आला नाही  पेणचे सरकारी दवाखाना ही आजारी आहे.आपण आमदार  कशासाठी निवडतो आपले प्रश्न मांडण्यासाठी की नाही? जिल्हा परिषदेच्या  १२१शाळा बंद पडल्या त्याच्यावर कोण बोलत नाही हे सगळे आपले मुद्दे आहेत आरोग्य असेल, पाणी असेल,शिक्षणा असेल रोजगार असेल हे आपले मुद्दे आमदारांनी सोडविले नाही...


Post a Comment

Previous Post Next Post