महाराष्ट्र वेदभुमी

विदर्भाची काशी अंबाळा झाली रोषणाईने प्रकाशमय


सचिन चौरसिया प्रतिनिधी

रामटेक: आमदार आशीष जैयस्वाल यानी ५ करोड़ची राशि अंबाला येथील पुरातन मंदिराच्या विद्युत रोशनाईकरिता मंजूर केल्याने मंदिरे रोशनाई प्रकाशमय झाली आहेत... प्रभु रामचंद्रांच्या पावन स्पर्शाने पुनीत झालेल्या रामटेक नगरीत अंबाळा तलावाचे महत्त्व अनन्य साधारण आहे... येथे दररोज हजारो लोक अस्थि विसर्जनच्या निमित्याने येत असतात... सुरू झालेले सौंदरीकरन पर्यटकाच्या मनाला भूरळ पाळत आहे... विशेष बाब ही आहे की अंबाळा येथे विविध मंदिर व छत्र्या धरुण ३२ स्मारके आहेत. ३३ वे अंबाला तलाव आहे...हे स्मारके व छत्र्या यांची निर्मिती १४ व्या  शतकात सुरू झाली... १७ व्या शतकात गोंड राजा व १८ व्या शतकात रघुजी राजे यांच्या काळात सर्वाधिक निर्माण कार्य झाली. अम्बाला तलाव  एक लाख ३३  हजार ५०० चौरस मिटर मध्ये बांधला  आहे....मंदिर वं तलावांच्या सभोवताल पर्वत रांगा आहेत... येथे अंबाला दरवाजा, सुर्यनारायन मंदिर, चंद्रमौली मंदिर, हरीहर मंदिर, महादेव मंदिर, पंच शिखरी मंदिर, दत्तमंदिर, दगडी महाल, जगनाथ मंदिर, रेनुका माता मंदिर, भुतलेश्वर मंदिर सहित आदि मंदिर आहेत...

आमदार जैयस्वाल म्हणाले की यापुढेही रामटेक गडमंदिरासह अंबाळा भागात विकास कामे केली जातील... 

नागपूर जिल्यातील महत्वपूर्ण स्थळ म्हणून रामटेकचा नावलौकिक आहे... रामटेकला  विदर्भाचे काश्मीरही म्हटले जाते... रामटेक गडमंदिरही विद्युत रोशनाई ने प्रकाशमय झालेले आहे...

Post a Comment

Previous Post Next Post