महाराष्ट्र वेदभुमी

रामटेक गडमंदिर येथे काकडा आरतीमध्ये ढोल तासाचा गजर

रामराज्य ढोल तासा पथकाने भगवान रामाच्या नावाने गजर

सचिन चौरसिया प्रतिनिधी

रामटेक : दिवाळीनिमित्त रामटेक गडमंदिर येथे १ नोव्हेंबर रोजी पहाटे ५ वाजता काकडा आरतीला भाविकांची मोठी गर्दी झाली होती. पहाट असून सुद्धा सुमारे १० हजार लोक उपस्थित होते. काकड़ाआरती करिता लोक सकाळी ३ वाजता उठतात. भाविकांना १०० किलो मिठाईचे वाटप व बटाटा पोह्यांचा नाश्ता देण्यात आला. काकडा आरतीची सुरुवात प्रभू राम -सीतेच्या मंदिरात पहाटे ५ वाजता सुरू होते. त्या अगोदर ४ वाजेपासुन भजनाला सुरुआत होते. पहाटे पाच वाजता दुर्गम भागातुन सुधा हजारो भाविक गडमंदिरात पोहोचले. काकडा आरती भक्त परीवारच्या वतीने शहरातील विठ्ठल मंदिरातुन गेल्या ३० वर्षांपासून कार्तिक महिन्यात पायी दिंडी काढण्यात येते. या पदयात्रा दिंडीत प्रकाश कस्तुरे, प्रभाकर महाजन, राजेंद्र गोलार, मारोती ठाकरे, अरुण भिलकर, राजेंद्र कडव, बोत्रे आदींचा समावेश आहे. भक्त परिवाराकडून दररोज काकडा आरतीच्या प्रसादाची व्यवस्था  केली जाते...

१ नोव्हेंबर रोजी दिवाळीच्या सणावर स्थानिक रामराज्य ढोल तासा पथकाने भगवान रामाच्या नावाने गजर केला. या पथकात ६५ हून अधिक तरुण-तरुणी, महिला व लहान मुले सहभागी झाली होती. रामराज्य ढोल तासा पथकाचे संचालक मोनू रघुवंशी यांनी सांगितले की श्री राम गड मंदिरात ढोल तासा वाजवण्याचा आनंद वेगळाच आहे. यावेळी उपविभागीय अधिकारी तथा श्री राम गडमंदिराचे रिसीव्हर प्रियेश महाजन, तहसीलदार रमेश कोळपे सहित आदी उपस्थित होते. त्रिपुरी पौर्णिमेच्या दिवशी १५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी राम रथयात्रा शहरात निघेल व गडमन्दिर येते  रात्री १२ वाजता टीपुर जाळुन त्रिपुरी पौर्णिमेची सांगता होईल. राम रथयात्रेसाठी बाबा किमतकर, अशोक सातपुते, खडकसिंग आदी प्रयत्नशील आहेत...

Post a Comment

Previous Post Next Post