महाराष्ट्र वेदभुमी

राजाभाऊ ठाकूर यांना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या मंगेशशेठ देशमुख यांचा पाठिंबा.


माणगाव :-   (नरेश पाटील) : श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे राजाभाऊ ठाकूर निवडणूक लढत आहेत... त्यांनी बॅरिस्टर अंतुलेंच्या समाधीचे दर्शन घेतल्यांनतर प्रचाराचा झंजावात निर्माण केला आहे... राजाभाऊ "लिफाफा" या प्रेमाचे आहेर म्हणून ओळखल्या जाणारे 'पाकीट चिन्हावर' निवडणूक लढत आहेत...दोन दिवसात राजाभाऊंनी श्रीवर्धन आणि म्हसळा तालुका पिंजून काढला...यावेळी त्यांना काँग्रेसच्या जुन्या कार्यकर्त्यांनी निवडून देण्याची हमी दिली... 

     राजाभाऊ ठाकूर यांनी माणगाव तालुक्यातील इंदापूर, तळा येथेही जोरदार प्रचार केला... त्यांनी  छोटी निवी मुठवली गाव येथील फार्महाऊसमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शरदचंद्र पवार गटातील तळा रायगड जिल्हा परीषदचे दोन वेळा निवडून आलेले माजी सदस्य मंगेशशेठ देशमुख यांची भेट घेतली...देशमुख यांनी काँग्रेस पक्ष पुरस्कृत काँग्रेस पक्षाचे माजी आमदार स्वर्गीय मधुकर ठाकूर यांचे सुपुत्र राजेंद्र मधूकर ठाकुर उर्फ राजाभाऊ ठाकूर यांना आपला जाहिर पाठींबा असल्याचे सांगितले... राजाभाऊ यांना बहुमताने निवडून आणणार असे देशमुख म्हणाले... यावेळी माणगाव तालुका काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष विलास सुर्वे उपस्थित होते...

Post a Comment

Previous Post Next Post