महाराष्ट्र वेदभुमी

नवरगाव येथे बांबू सावली रचनेचे लोकार्पण


सचिन चौरसिया प्रतिनिधी

रामटेक:  कविकुलगुरु इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्स (किट्स) अभियांत्रिकी महावि‌द्यालय रामटेकच्या अंतर्गत वास्तुकला विभागातर्फे नवरगाव ग्रामपंचायत येथे बांबू सावली रचनेचा लोकार्पण सोहळा उत्साहात संपन्न झाला...

कार्यक्रमाची अध्यक्षता प्राचार्य डॉ अविनाश श्रीखंडे यांनी केली... याप्रसंगी किट्स चे डीन (विद्या विभाग) डॉ विलास महात्मे, विभाग प्रमुख कल्पना ठाकरे,  नवरगाव ग्रामपंचायत सरपंच ज्योती ठाकरे, ब्रम्हकुमारीच्या ललिता दीदी, उपसरपंच व सदस्य, प्राध्यापक व वि‌द्यार्थी मोठ्या  संख्येने उपस्थित होते...  

अध्यक्षीय भाषणात डॉ.अविनाश श्रीखंडे यांनी वि‌द्यार्थ्यांना भविष्याबद्दल मार्गदर्शन केले  व म्हणाले की बांबू  पासुन वास्तुकला विभागातर्फे  उत्कृष्ट  तयार केलेले शेड विविध कार्यक्रमाकरिता ग्रामपंचायतला वापरता येईल... विभाग प्रमुख कल्पना ठाकरे यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली... 

बांबू शेडची प्रेरणा ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्ववि‌द्यालय या एनजीओच्या कार्यपद्धतीनुसार केली आहे... ब्रह्माकुमारी रामटेकच्या संचालिका ललिता दीदी म्हणाल्या की बांबू सावली रचनेचा विविध सामाजिक परिवर्तनासाठी उपयोग करता येईल... हा कार्यक्रम नासा, इंडिया (नॅशनल असोसिएशन ऑफ स्टुडन्ट ऑफ आर्किटेक्चर) अंतर्गत राबविण्यात आला... ह्या संपूर्ण प्रक्रियेत आर्किटेक्ट अंजली नरड व आर्किटेक्ट अभिलाषा डोंगरे यांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले...

कार्यक्रमाचे संचालन सायली घोडके व शिवानी कापिले यांनी केले तर आभार प्रदर्शन अपूर्वा मेश्राम हिने केले...

Post a Comment

Previous Post Next Post