कुंभोज : सचिन लोंढे
हुपरी येथील कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याची सन २०२४ ते सन २०२९ या कालावधीसाठी जाहीर झालेली संचालक मंडळाची आठवी पंचवार्षिक निवडणूक शनिवारी अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी निवडणूक रिंगणात १९ जागांसाठी १९ अर्जच शिल्लक राहिल्याने ही निवडणूक बिनविरोध झाल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे...
याबाबतची अधिकृत घोषणा दि.३० नोव्हेंबर रोजी कारखाना कार्यस्थळावर होणाऱ्या सर्वसाधारण सभेत निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अमोल येडगे करणार आहेत... कारखान्याच्या स्थापनेपासूनची ही आठवी पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध होण्याची परंपरा यावेळीही कायम राहिली आहे.... यावेळीही तब्बल १० जणांना वगळून नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे... संस्थापक माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे व आमदार प्रकाश आवाडे यांच्या विशेष प्रयत्नांतून १९९० मध्ये कारखान्याची स्थापना झाली... सुरूवातीच्या काळात २५०० मेट्रिक टन गाळपाची क्षमता असणाऱ्या या कारखान्याने आत्ता हंगामात २० लाख मेट्रिक टन गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण केले आहे...
या निवडणुकीत बिनविरोध निवडून आलेले संचालक : उत्पादक सभासद गटः विद्यमान अध्यक्ष कल्लाप्पाण्णा बाबुराव आवाडे, आमदार प्रकाश कल्लाप्पाण्णा आवाडे (इचलकरंजी), उपाध्यक्ष बाबासो पारीसा चौगुले (कुंभोज), आदगोंडा बाबुराव पाटील (हेरले), शीतल अशोक अमण्णावर (बोरगाव), सुरज मधुकर बेडगे (हुपरी), गौतम बाबुराव इंगळे (कोथळी), अभयकुमार भालचंद्र काश्मिरे (रुई), संजयकुमार भूपाल कोथळी (अकिवाट), पार्श्वनाथ उर्फ सुनील अशोक नारे (बेडकीहाळ), दरगोंडा बसगोंडा कुगे- पाटील (चंदूर), प्रकाश बाळासो पाटील (पट्टणकोडोली), सुनील सातगोंडा पाटील (सिदनाळ), दादासो नरसू सांगावे (अब्दुललाट). महिला प्रतिनिधीः कमल शेखर पाटील (सुळकुड), वंदना विजय कुंभोजे (गौरवाड). अनुसूचित जाती / जमाती प्रशांत महादेव कांबळे, बिगर उत्पादक व संस्था प्रतिनिधी आण्णासाहेब गोपाळ गोटखिंडे (यळगूड), सुभाष बापूसो जाधव (इचलकरंजी)...