महाराष्ट्र वेदभुमी

स्विप कार्यक्रमातंर्गत मतदान जनजागृती करून १९० उरण विधानसभातर्फे मतदान करण्याचे आवाहन

उरण १० नोव्हें.(अजय शिवकर) : जेष्ठ नागरिक माॅर्निग कट्टा विमला तलाव उरण व एस्.टी डेपो उरण या ठिकाणी मतदार जनजागृती कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी केंद्र प्रमुख सौ.निर्मला घरत , केंद्र प्रमुख श्री.बबन पाटील ,सौ.समता ठाकूर,श्री.संजय होळकर,संजीव पाटील, संगिता गावंड यांनी मतदानाचे महत्त्व पटवून दिले, प्रकाश पाटील यांनी सर्वांचे स्वागत केले,संजय होळकर सर यांनी स्विप तर्फे सर्व उपस्थित मतदारांचे स्वागत केले तर बबन पाटील यांनी मतदानाचे महत्त्व सांगितले. यावेळी शाम कुलकर्णी सर,श्री.दर्णे, प्रकाश पाटील यांनी आपली मते मांडली,निर्मला घरत यांनी माहिती दिली,तर समता ठाकूर यांनी आभार मानले यावेळी  श्री.अजयजी शिवकर,श्री.सूर्यकांत दांडेकर,आनंद‌ बुधे,नितीन पडते, दिनेश घरत, विकास ठाकूर,आदि मंडळी उपस्थित होती, यावेळी मी मतदान करणार.. या बोर्ड वर सह्यां करण्यात आल्या.मतदान माझा हक्क आहे ही बॅनर घेत मतदार राजा जागा हो...लोकशाहीचा धागा हो...पुरूष असो वा नारी...मतदान करणे ही आपली जबाबदारी..इ.घोषणा देत  राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली...

Post a Comment

Previous Post Next Post