महाराष्ट्र वेदभुमी

अलंकापुरीत लोटला लाखो भाविकांचा जनसागर,पायी दिंड्यां अलंकापुरीत दाखल

 


ज्ञानोबा तुकोबांच्या गजरात माऊलीला प्रदक्षिणा घालून आनंद लुटला.

रायगड ( श्याम लोखंडे ) 'ज्ञानियांचा शिरोमणी वंद्य जो का पुज्यस्थानी, चिंताकांचा चिंतामणी, ज्ञानोबा माझा...' असे म्हणत खांद्यावरिल भगव्या पताका उंचावत वैष्णवांची मांदियाळी. रविवार पासून आळंदी आलंकापुरित मावऊलींच्या संजीवन समाधी सोहळ्यासाठी पायी दिंडी सह भाविक लाखोंच्या संख्येने या समाधी संजीवनी सोहळ्यासाठी आळंदीत दाखल झाले असून कार्तिकी एकादशी निमित्ताने लाखो भाविकांच्या वतीने मोठ्या भक्ती भावाने माऊलीला प्रदक्षिणा व संजवणी समाधी सोहळ्याकरीता या ठिकाणी स्थानिक पालिका यंत्रणेसह आरोग्य व पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे..


पंढरपुरातील विठ्ळाच्या पादुकांसह संत नामदेवराय, पुण्डलिकराय यांच्या पालख्या दाखल झाल्या आहेत, तर कोकण भागातून ठाणे ,रायगड, रत्नागिरी ,तसेच मुबई,या अनेक जिल्ह्यातून अधिक दिंड्यांचे आगमन झाले आहे,हातात भगव्या पताका कपाळी बुक्का, केसरी गंध, गळ्यात तुलशीच्या माळा अन मुखातून 'ज्ञानोबा-तुकारामा'चा जयघोष टाळ मृदुंगाच्या गजरात लाखो भाविकांची असंख्य पावले आपल्या घरान्यातिल अविरतपणे व परंपरेने चालत आलेली संप्रदायिक वारी संत महात्म्य कीर्तनकार, प्रवचनकार, फडककरी, माऊलीचरणी समर्पित करण्यासाठी आळंदी अलंकापुरीत येऊन दाखल होत भक्तीचा तसेच या सोहळ्याचा आनंद घेण्यासाठी आले आहेत..

नाशिक अहमदनगर, नाशिक औरंगबाद, बिड ,शिरूर, कोकण प्रांतातून कोकण वाशियांचे श्रद्धास्थान गुरुवर्य स्वानन्द सुख निवासी अलिबागकर महाराज यांच्या कृपा आशीर्वादने व त्यांच्या पाऊलावर पाऊल टाकत ठाणे रायगड व रत्नागिरी तळ कोकणातून त्यांचे अनुयायी विविध फडकरी यांच्या प्रेरणेने सर्वाधीक म्हणजे अधिक पायी दिंड्या आळंदीत या संजीवनी समाधि सोहळ्यासाठी दिंडी सह लाखोंच्या संख्येने भाविक दाखल झाले आहेत...

ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर l मुखी म्हणता चुकतील फेरे ll 

होतील संतांचिया भेटी l सांगू सुखाचिया गोष्टि ll 

आळंदी अलंकापुरीत माऊलीच्या प्रेरणेने संतांची मांदियाळी ने सारी आळंदी अलंकापुरी माऊलीच्या जयघोषात दूम दुमत आहे, चला आळंदीला जाऊ ज्ञानेश्वर डोळा पाहू, संजीवनी समाधी सुख सोहळा डोळे भरून पाहण्यासाठी लाखोंच्या संख्येने वारकरी सम्प्रदायिक भाविक व भक्तगण दाखल झाले असून दरम्यान कार्तिकी एकादशी निमित्ताने गेली तीन दिवसांपासूनच पहाटे पासूनच माऊलींच्या दर्शनबारीच्या रांगेतही भाविकांची गर्दी ओसंडून लागली असली तरी महाद्वारातून बाहेर पडण्यासाठी मार्ग आहे... या ठिकाणी धातुशोधक यंत्रना बसविण्यात आली आहे...मंदिरासह आळंदीत ठिकठिकाणी सीसीटीव्ही यंत्रणा देखील बसविण्यात आली आहे... तसेच आळंदी नगर परिषद प्रशासनाकडून कर्मचारी व पुणे जिल्हा पोलीस यंत्रणा व आरोग्य यंत्रने सह विविध यांत्रना देखील यासाठी कमालीची सुसज्य झाली असून भाविकांना उत्तम प्रकारे शासकीय यंत्रणेद्वारे सहकार्यातुन सहकार्य करत असून भक्तग्णांना माऊलीचे दर्शन घडत आहे..

कार्तिकी एकादशीनिमित्त हजारो भाविक; आळंदीत मराठवाडा,विदर्भ, खानदेश, कोकणातून दिंड्या

खेळ मांडीयेला वाळवंटी घाई । नाचती वैष्णव भाई रे ॥ 

क्रोध अभिमान गेला पावटणी । एक एका लागतील पायी रे ॥ 

गोपीचंदनउटी तुळसीच्या माळा । हार मिरविती गळा ॥ 

टाळ मृदुंग घाई पुष्प वर्षाव । अनुपम्य सुखसोहळा रे ॥

टाळ-मृदंगाचा टिपेला पोहोचलेला भाविकांचा भक्तिकल्लोळ.., माउली माउली असा अखंड जयघोष... वैष्णवांच्या मेळ्याने बहरून आलेला इंद्रायणीचा काठ... माउलींच्या दर्शनासाठी लागलेल्या लांबच लांब रांगा... अशा वातावरणाने रविवार सोमवार पासून अलंकापुरी दुमदुमून गेली... संतश्रेष्ठ श्रीज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्यात मंगळवारी एकादशी असल्याने त्याच्या पूर्वसंध्येला रविवारी आणि सोमवारी मराठवाडा, विदर्भ, खानदेश, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातून आळंदीमध्ये दिंड्या दाखल झाल्या आहेत..

संतश्रेष्ठ श्रीज्ञानेश्वर माउलींच्या संजीवन समाधी सोहळ्यात मंगळवारी आलेल्या कार्तिकी एकादशीच्या भक्ती पर्वणीचा योग साधण्यासाठी नवमी दशमी पासूनच मोठ्या संख्येने भाविक आळंदीत दाखल झाले. इंद्रायणी घाटावर त्यांनी फुगडीचा फेर धरला, तर काहींनी टाळ-मृदंगाच्या गजरात देहभान विसरून नाचण्याचा आनंद लुटला...

तर आज एकादशी म्हणून पहाटेपासूनच वारकऱ्यांच्या राहुट्या व कार्तिकी एकादशीनिमित्त पहाटे धर्मशाळांमधून अभंगांच्या सुरावटी निघू लागल्या होत्या, टाळ मृदंगाच्या गजराने आसमंत भरून गेला होता... स्नानासाठी इंद्रायणी तीरावर वारकऱ्यांची अलोट गर्दी झाली होती...

कार्तिकी यात्रेसाठी इंद्रायणी नदीत पाणी सोडण्यात आले आहे. यामुळे पाण्याप्रमाणे भाविकांची भक्तीही जणू दुथडी भरून वाहत असल्याचे चित्र सोमवार पासून अधिक पाहायला मिळाले. दुसरीकडे श्रीमाउली मंदिरामध्ये पहाटेपासून विविध धार्मिक विधींना सुरुवात झाली होती. स्नानानंतर श्रीमाउलींच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी दर्शनबारी पूर्णपणे भरून गेली होती. यंदाच्या संजीवन समाधी सोहळ्यासाठी लाखोंनी वारकरी आळंदीत दाखल झाले आहेत. त्यांच्यासाठी आळंदी पालिका व जिल्हा प्रशासनाकडून विविध सोई-सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत...

आळंदी यात्रेसाठी राज्यभरातून वारकरी भाविक आळंदीत दाखल झाले आहेत यामुळे इंद्रायणी नदीघाट भाविकांनी फुलून गेला आहे .तर विविध जिल्ह्यातून कानाकोपऱ्यातून आलेल्या वारकरी मंडळींची गाठी भेटी गळा भेट होत असल्याने त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद अधिक फुलून येतोय..

बुधवारी द्वादशीला पार पडणार माउलींचा रथोत्सव

या दिवशी श्रीमाउलींचा रथोत्सव परंपरेनुसार पार पडत असतो... यंदादेखील हा रथोत्सव मोठ्या उत्साहात पार पडणार असून, यंदाच्या रथोत्सवाचे विशेष म्हणजे नरसिंह सरस्वती यांनी बनविलेल्या १५० वर्षे जुन्या लाकडी रथातून श्रीमाउलींचा यंदाचा रथोत्सव होणार आहे. त्यामुळे बुधवारी द्वादशी निमित्ताने भाविकांसाठी ही आगळीवेगळी पर्वणी असणार आहे...

चला आळंदीला जाऊ ,ज्ञानेश्वर डोळा पाहू l होतील संतांचिया भेटी ll 

प्रवचनकार कीर्तनकार विणेकरी, टाळकरी फडकरी संत मंडळी यांची गळाभेट भेटाभेटीचा अलंकापुरीत देव धर्म समाज मानवता यांची नीती मूल्यांची जोपासना जाणारे म्हणजे भारतीय संस्कृतीतील वारकरी संप्रादय,

मार्ग दाऊनीया गेले आधी l दयानिधी संत ते ll तेणेचि पंथे चालो जाता l न पडे गुंथा कोठे काही ll 

कोकण वाशियांचे श्रद्धास्थान गुरुवर्य स्वा. सुख निवासी अलिबागकर महाराज यांच्या प्रेरणेने गुरुवर्य गोपालबाबा वाजे गुरुवर्य धोंडूबाबा कोल्हटकर यांच्या कृपा आशीर्वादाने कोकण प्रांत रायगड मधून ग्यानबा तुकारामाच्या जयघोषात व टाळ मृदुंगाच्या गजरात हजारो दिंड्यांचे आळंदी आलंकापुरीत रविवार पासून दाखल झाल्या आहेत तर त्यांची देखील दिंडी प्रदक्षिणा मोठी पर्वणीच ठरली तर फुगडी खेळ खेळत तसेच रिंगण त्याच बरोबर थर लावून पक्कावाज वाद्य वाजवून भगवी पताका उंचावत या दिंडी सोहळ्यात आनंद लुटत आहेत...

Post a Comment

Previous Post Next Post