महाराष्ट्र वेदभुमी

विजय तोडणकर यांच्या नेतृत्वाखाली खा.शरद पवार यांना सभेचे निमंत्रण.

माणगाव :- (नरेश पाटील) : १९३ श्रीवर्धन विधानसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार अनिल नवगणे यांच्या प्रचार सभेचे निमंत्रण देणे व मतदार संघातील परिस्थितीची कल्पना देण्याकरिता व इतर विषयांवर चर्चा करण्याकरिता काँग्रेस पक्षाचे श्रीवर्धन विधानसभा मतदार संघांचे नवनिर्वाचित अध्यक्ष विजय तोडणकर यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीच्या एका शिष्टमंडळाने सन्माननीय खासदार, माजी केंद्रीय मंत्री, माजी मुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख शरदचंद्र पवार साहेब यांची पुणे येथील मोदी बाग येथे दि.१४ नोव्हेंबर रोजी गुरुवारी भेट घेतली... 

यावेळी सदर शिष्टमंडळामध्ये  माणगांव नगरपंचायतचे  माजी नगराध्यक्ष ज्ञानदेव पोवार, श्यामकांतजी भोकरे, नजीरजी गंगरेकर, बाबुशेठ परकर, विनोद तोडणकर, शुकूर हुसेनी, यांच्यासह अनेक मान्यवर कार्यकर्ते उपस्थित होते... दरम्यानाचा काळात म्हसळा येथे दि.१६ रोजी सकाळी १० च्या सुमारास जाहीर सभा पार पडणार असल्याचे बाब वार्तालाभ करताना विजय तोडणकर यानी माहिती दिलेय ..तसेच जाहीर सभे करिता इतर दिग्गज नेते संजय राऊत, भास्कर जाधव, शेकाप चे सर्वेसर्वा जयंत पाटील, रायगड जिल्हा काँग्रेस अध्यक्ष महेंद्र घरत, माजी राजीप सभापती तथा माणगाव नगर पंचायतचे नगराध्यक्ष ज्ञानदेव पोवार सह अनेक मान्यवर उपस्थिती असणार आहे... १९३ श्रीवर्धन विधानसभा मतदार संघ महाविकास आघाडीचे घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार यांच्या पक्षाला ही जागा गेल्याने "तुतारी" या चिन्हावर अनिल नवगणे निवडणूक लढत आहेत... 

सदर कार्यक्रमास आदरणीय शरद पवार हे काय बोलणार या कडे सर्वांची लक्ष लागणार आहे ...कारण  विद्यमान श्रीवर्धनचे आमदार कु. अदिती सुनील तटकरे या शरद पवार साहेब यांना सोडून अजित पवार यांचा बरोबर गेल्याने पवार साहेब काय बोलणार याच्याकडे संपूर्ण श्रीवर्धन विधानसभा सत्तेमध्ये कुतूहल वाढले आहे.. त्याचबरोबर जसे जसे निवडणुकीची तारीख जवळ येऊ लागली आहे तसे तसे निवडणुकीचे वातावरण तापू लागली आहे...  राजकीय जानकर यांचा मते दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये काटे कि टक्कर पाहायला मिळणार आहे...

  दरम्यान श्रीवर्धन विधानसभा मतदार संघ पाहिल्यास हे बॅरिस्टर अंतुले यांचा बाले किल्ला असल्याने तसेच शरद पवार यांचा उपस्थितीत एक बडा नेता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटातील खा. सुनील तटकरे यांची साथ सोडून प्रवेश करणार असल्यामुळे आणि श्रीवर्धन काँग्रेस पक्षाचे अनेक काँग्रेस कार्यकर्ते विजय तोडणकर यांचा भक्कम पाठिंबा अनिल नवगणे यांना असल्याने आणि त्यातही ज्ञानदेव पोवार यांना मानणारे मोठया मतदार वर्गाची साथ लाभत असल्याने महाविकास आघाडीचे उमेदवार अनिल नवगणे यांचे पारडे जड मानले जाते...

Post a Comment

Previous Post Next Post